कामदेवाचं अस्त्र जे माणसाच्या मनात प्रेम जागृत करतात

शास्त्रामध्ये वसंत पंचमीला मदनोत्सव देखील म्हटलं जातं. कारण कामदेवांचं एक नाव मदन हे देखील आहे. कामदेवांमुळे हृदयात प्रेमभाव निर्माण होतो. 

Updated: Feb 15, 2016, 10:52 AM IST
कामदेवाचं अस्त्र जे माणसाच्या मनात प्रेम जागृत करतात title=

मुंबई : शास्त्रामध्ये वसंत पंचमीला मदनोत्सव देखील म्हटलं जातं. कारण कामदेवांचं एक नाव मदन हे देखील आहे. कामदेवांमुळे हृदयात प्रेमभाव निर्माण होतो. 

शास्त्रामध्ये अशी कथा आहे की जेव्हा शंकर भगवान यांनी कामदेवांना भस्म केलं होतं तेव्हा कामदेवांनी त्यांचं शरिर पुन्हा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यावेळेस भगवान शंकर यांनी कामदेवांना अनेक वस्तूंवर वास करण्यासाठी अधिकार दिले होते.

यौवनं स्त्री च पुष्पाणि सुवासानि महामते:। गानं मधुरश्चैव मृदुलाण्डजशब्दक:।। उद्यानानि वसन्तश्च सुवासाश्चन्दनादय:। सङ्गो विषयसक्तानां नराणां गुह्यदर्शनम्। वायुर्मद: सुवासश्र्च वस्त्राण्यपि नवानि वै। भूषणादिकमेवं ते देहा नाना कृता मया।।

श्लोकाचा अर्थ असा की, कामदेवाचा निवास यौवन, स्त्री, सुंदर फूल, गीत, परागकण, पक्षांचे स्वर, सुंदर बाग, वसंत ऋतू, चंदन, मंद हवा, सुंदर घर, आकर्षक वस्त्र धारण केलेले अंग शिवाय कामदेव स्त्रीयांच्या शरिरावर वास करतात. खास करून नयन, भूवया, ओठ यावर कामदेवांचा प्रभाव अधिक असतो.

अस्त्रशस्त्राच्या रुपातही कामदेव वास करतात. धनुष्य बाणामध्ये कामदेवांचा वास आहे. 
कामदेवांकडे मनुष्याच्या मनात प्रेम जागृत करण्यासाठी ५ पुष्पबान आहेत. हे पुष्पबाण व्यक्तीमध्ये आनंद आणि गोडवा तयार करतो. आवाज न करता तो सरळ हृद्याला भिडतो.

कामदेवांच्या सहायक रुपात वसंत ऋतू आणि त्यांच्या पत्नी रतीचं नाव घेतलं जातं. देवतांच्या आग्रहामुळे कामदेवांनी भगवान शंकराचं ध्यान भंग करण्यासाठी या दोघांनीही कामदेवांची मदत केली होती.