लग्नाची अंगठी अनामिकेतच का बरं घालतात?

मुंबई : लग्न करताना घातली जाणारी अंगठी अनामिकेतच का घातली जाते असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

Updated: Jan 13, 2016, 05:12 PM IST
लग्नाची अंगठी अनामिकेतच का बरं घालतात?

मुंबई : लग्न करताना घातली जाणारी अंगठी अनामिकेतच का घातली जाते असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? जगात जवळपास सर्वत्रच अशी प्रथा आहे. यात सर्वांची कारणं वेगळी असली तरीही अंगठीचे महत्त्व अबाधित आहे.पूर्वेकडील म्हणजे चीनमध्ये पूर्वापार असा समज राहिला आहे की विवाह हे सर्वात पवित्र बंधन असते. त्यामुळे विरुद्ध हातांतील अनामिकेत अंगठी घातल्याने हे बंधन घट्ट राहते. कारण दोन हातांचे तळवे एकमेकांना जोडल्यास अनामिका वेघळ्या करणे कठीण असते. 

तर पश्चिमेकडील रोमन संस्कृतीत असा समज होता की अनामिकेतून निघणारी नस थेट हृदयाशी जाऊन मिळते. तेव्हा हे बंधन दोन हृदयांचे असावे. ह्या नसेला 'वेन अमोरिस' म्हणतात ज्याचा लॅटिन भाषेत अर्थ 'प्रेमाची नस' असा आहे. म्हणून आजही पाश्चात्य लोक अनामिकेत अंगठी घालतात.