अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी ‘निर्भया निधी’

दिल्ली गँगरेप घटनेचे पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पावरही उमटले आहेत. भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. या निधीला ‘निर्भया निधी’ हे नाव देण्यात आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 28, 2013, 02:35 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली गँगरेप घटनेचे पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पावरही उमटले आहेत. भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. या निधीला ‘निर्भया निधी’ हे नाव देण्यात आलं आहे.
स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. या निधीला निर्भया निधी असं नाव देण्यात आलं आहे. महिलांच्या सुरक्षा निश्चितीसाठी हा निधी उभारण्यात येत आहे. महिलांची सुरक्षा ही देशाची सामूहिक जबाबदार असल्याचं चिदम्बरम यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वीच देशाच्या राजधानीत चालत्या बसमध्ये एका मुलीवर झालेल्य़ा निर्घृण सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या अनुषंगाने हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नव्याने उभा राहिला आहे. भारतासारख्या प्रगतीशील देशासाठी अशी घटना निंदाजनक असून त्यांचा विचार करता ही घटना देशाला मागे नेणारी आहे.

कुठल्याही कामानिमित्त महिला सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडल्यास त्यांच्याविरोधात हिंसक गोष्टी घडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे चिदम्बरम यांनी या वर्षी अर्थसंकल्प जाहीर करताना महिलांच्या सबलीकरणाचा मुद्दा उचलून धरत महिलांच्या सुरक्षेसाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची तरतुद अर्थसंकल्पात केली आहे.