बजेट २०१३-१४ ची वैशिष्ट्ये

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम संसदेत २०१३-१४ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. पी. चिदंबरम यांचे अर्थमंत्री म्हणून हे आठवे बजेट असून ते आज संसदेत बजेट सादर करत आहेत

Updated: Feb 28, 2013, 04:53 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम संसदेत २०१३-१४ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. पी. चिदंबरम यांचे अर्थमंत्री म्हणून हे आठवे बजेट असून ते आज संसदेत बजेट सादर करत आहेत. सर्वसामान्यांच्या नजरा मात्र आपल्या खिशाला आणखी ताण पडणार की थोडा फार दिलासा मिळणार याकडे लागून राहिलंय. चला, पाहुयात काय काय मांडलं गेलंय या अर्थसंकल्पात...
अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे –
काय स्वस्त, काय महाग
>तयार कपडे स्वस्त होणार
>मोटारसायकल, महागड्या गाड्या महागणार
>मार्बल महागणार
>औषध महागले
>चांदी महागली
>वातानुकुलित हॉटेल्सण महागणार
>सर्व वातानुकुलित हॉटेल्स‍ सेवाकरांच्यार कक्षेत
>सिगारेटवर १८टक्के उत्पायदन शुल्कई, सिगारेट आणि सिगार महागणार
>आयात केलेले रेशीम महागणार
>चामड्याच्या जोड्यांवर निर्यात करात घट
>२ हजारांपेक्षा जास्त किंमतीचे मोबाईल महागणार
>सिगारेट महागणार
>परदेशी बाईकही महागणार
>परदेशी गाड्या महागणार
>परदेशी बूट स्वस्त होणार
>मोटरसायकल महागणार
>टीव्हीचा सेट टॉप बॉक्स महाग
>फोन बील आणि अन्न महागणार नाही
इन्कम टॅक्समध्ये किती फायदा
>५ लाख उत्पन्न - २००० रुपये फायदा
>४ लाख उत्पन्न - २००० रुपये फायदा
>३ लाख उत्पन्न - २००० रुपये फायदा
>इन्कम टॅक्समध्ये तुमचा फायदा - १ लाख उत्पन्न - ० रुपये
>२ लाख २० हजार उत्पन्नावर टॅक्स नाही
>आयकर रचनेत कुठलाही बदल नाही
>इनकम टॅक्स स्लॅब बदलणार नाही
>पाच लाखांवर उत्पन्न असणाऱ्यांना कोणतीही सूट नाही
>श्रीमंतांचा टॅक्स वाढला, मध्यमवर्गावर बोजा नाही
>१ कोटी रूपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना बसणार सरचार्ज
>अतिश्रीमंतांवर १० टक्के् सरचार्ज लागणार
>५ लाख उत्पन्न असलेल्यांना २ हजार रुपये सूट
>कर सुधारणेसाठी आयोगाची नेमणूक करणार
>टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही
कर प्रणाली
>महिला १ लाख रुपयांपर्यंतचे सोने परदेशातून आणू शकतात
>एक्साईज ड्यूटी (अबकारी कर) कोणताही बदल नाही
>सर्विस टॅक्स (सेवा कर) कोणताही बदल नाही
>भारतात ४२८०० लोकांचे १ कोटी पेक्षा अधिक उत्पन्न्
मालमत्ता विक्री
>कृषी जमीन खरेदी-विक्रीवर टीडीएस नाही
>५० लाखांपेक्षा अधिकची संपत्ती विकल्यास १ टक्के टीडीएस
महिलांसाठी
>दिल्लीच्या घटनेनंतर १ हजार कोटीचा निर्भया फंड
>महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार
>महिलांसाठी सुरू होणाऱ्या बँकेत फक्त् महिलांनाच खाते
>बचतगटातील महिला आणि घर कामगार करणा-या महिलांसाठी विमा योजना
>महिला विशेष बँकेसाठी ऑक्टोगबर २०१३ पर्यंत बँकिंग परवाना
>महिला सार्वजनिक बँकेसाठी १ हजार कोटी रुपंयाचा सरकारकडून निधी
>अर्थमंत्र्यांची महिलांसाठी ऐतिहासिक घोषणा । महिला सक्षमीकरणावर दिला भर
>बॅंकेतील सर्व कर्मचारी महिलाच असणार
>महिलांची सरकारी बँक १०० कोटी रुपयांनी सुरू होणार
>महिलांसाठी सार्वजनिक क्षेत्रात पहिली बॅंक सुरू होणार
>महिलांसाठी पहिली बँक सुरू होणार
कृषी
>खासगी बॅंकांतून शेतकऱ्यांना घेता येणार कर्ज
>राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी ९९५४ कोटी रुपये
>यंदाच्या बजेटमध्ये शेतीसाठी भरीव तरतूद
>शेतीसाठी ७ लाख कोटीं कर्जाची तरतूद
>कृषी मंत्रालयासाठी २७ हजार कोटींची तरतूद
>कृषी संशोधनासाठी ३४१५ कोटींची तरतूद
>कृषिविकासाठी ९९० कोटी रुपये
>वेळेवर कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना मिळणार सूट
>छोट्या शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा क्रेडिट फंड
विमा
>विमाच्या थर्ड पार्टी क्लेमसाठी न्यायालय स्थापन होणार
>आरोग्य विमा योजनेत रिक्षा चालकही येणार
>१०००० लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात LIC ऑफीस
>ऑटो रिक्षा आणि रद्दीवाल्यां्नाही आरोग्य विम्याऑचा लाभ होणार
बँकिंग
>सरकारी बँकांच्या सर्व शाखांमध्ये ATM सेंटर सुरू करणार
>सर्व सरकारी बँका ऑनलाइन होणार
>सरकारी बँकासाठी १४००० कोटी रुपये
एफएम रेडिओ
>२९४ शहरांमध्ये खासगी एफएम
>१ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात एफएम रेडिओ
होमलोन व्याज सूट
>पहिल्या घराच्या २५ लाखाच्या कर्जावरील व्याजावर आता एकूण सूट २.५ लाखांची सूट
>पहिल्या घराच्या २५ लाखाच्या कर्जावरील व