सामना हारलो, मालिका जिंकलो!
धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ईयान बेलच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारताला अखेरच्या वन-डेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. शेवटची वन-डे गमावली असली तरी, भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज 3-2 नं जिंकली आहे.
इंग्लंड बॅकफूटवर, इंग्लंडला दुसरा धक्का
धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळली आहे. इंग्लिश टीमच्या तेज मा-यासमोर टीम इंडियाच्या बॅट्समनचं काहीच चालल नाही.
स्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड (पाचवी वन-डे)
भारत विरुद्ध इंग्लड... पाचवी वन-डे... इंग्लंडने ७ गडी राखून केली भारतावर मात
टीम इंडियापुढे २५८ रन्सचे आव्हान
इंग्लडने टीम इंडियापुढे विजयासाठी २५८ रन्सचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडकडून ऍलिस्टर कूक, केवीन पीटरसन आणि ज्यो रूट यांनी अर्धशतके झळकावलीत.
स्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड... चौथी वन-डे
भारत विरुद्ध इंग्लड... चौथी वन-डे... नाणेफेक जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय |
स्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड... तिसरी वन-डे
भारत विरुद्ध इंग्लड... तिसरी वनडे... नाणेफेक जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय |
आपल्या घरात धोनी देणार इंग्लंडला मात?
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरी लढत रांचीमध्ये रंगणार आहे. दुसऱ्या वन-डेत कमबॅक केलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल तर दुसरीकडे विजयाची मालिका खंडित झाल्याने इंग्लंड टीम सावध झाली असेल.
स्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड (दुसरी वन डे)
कोचीमधील पहिल्या वन डे सामन्यात इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारताने उडवली कोचीत विजयाची पतंग
कोची: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. कोचीमध्ये सुरू असलेल्या या सामान्यात भारताने सावध सुरवात केली आहे.
टीम इंडियाचं काय होणार?
टीम इंडियाच्या मागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र संपायचं नावच घेताना दिसत नाही आहे.
कोच डंकन फ्लेचरची हकालपट्टी होणार?
वर्ल्डकप जिंकल्यानंतर डंकन फ्लेचर यांची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, फ्लेचर यांनी टीमची सूत्रं हाती घेतली आणि टीमच्या कामगिरीच्या आलेख खालावत गेला. यामुळेच आता कोच फ्लेचर यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.
इंडिया वि. इंग्लंड : दुसऱ्या वन-डेसाठी कोची सज्ज!
टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यानची दुसरी वन-डे कोचीमध्ये रंगणार आहे. पहिली लढत गमावलेल्या टीम इंडियासमोर कमबॅकचे आव्हान असेल तर सीरिजमध्ये १-० नं आघाडी घेतलेल्या इंग्लंड टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. म्हणूनच धोनी सेनेसमोर इंग्लिश ब्रिगेडचं आक्रमण रोखण्याचं कडवं आव्हान असणार आहे.
भारत X इंग्लड : इंग्लंडकडून भारताचा ९ रन्सनं पराभव
सौराष्ट्र किक्रेट स्टेडियमवर शुक्रवारी रंगलेल्या वनडे मॅच सीरिजमधल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा पराभव केलाय. भारताला ९ रन्सनं पराभव स्वीकारावा लागलाय.
टीम इंडियासमोर ३२६ रनचं आव्हान
इंडिया-इंग्लंड राजकोट येथील पहिल्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडने टीम इंडियासमोर ३२६ रनचं आव्हान ठेवलं आहे. चार विकेट गमावत त्यांनी इंडियासमोर हे आव्हान ठेवलं आहे.
इंग्लंडची दमदार सुरवात... बॉलर पुन्हा नाकाम
राजकोट वन-डेमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये शमी अहमदऐवजी अशोक दिंडाला भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध इंग्लंड
राजकोटमधील पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
धोनीने टी-२० कर्णधारपद सोडावे-द्रविड
मायदेशातील मालिकापराभवांमुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका होत असली तरी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने धोनीची पाठराखण केली आहे.
सचिन शिवाय टीम इंडिया तुम्हांला रुचते का?
सचिन तेंडुलकरवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, असा सल्ला माजी कर्णधार कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनी आणि टीम इंडियाला दिला होता.