www.24taas.com, कोची
अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्या कामगिरीच्या जोरावर भारताने दुस-या लढतीत इंग्लंडवर १२७ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
कोची येथे झालेल्या या लढतीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सुरूवातीच्या झटक्यांनंतर भारताने ६ बाद २८५ धावा केल्या. मात्र, इंग्लंडचा संघ ३६ षटकात १५८ धावांत गुंडाळला गेला. इंग्लंडकडून पीटरसन (४२) जे. रुट (३६) आणि समित पटेल नाबाद ३० यांनी सर्वांधिक योगदान दिले. त्याआधी सुरैश रैना (५५), कर्णधार महेंद्रसिंग धोनी (७२) आणि रविंद्र जडेजा (नाबाद ६१) यांनी शानदार खेळी करत भारताला आश्वासक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवले.
भारत-इंग्लंड यांच्यांत सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे मध्ये भारताने इंग्लंडसमोर २८६ रनचं आव्हान ठेवलं आहे. सुरवात अतिशय वाईट झाल्यानंतर काही काळा युवराज आणि कोहलीने डाव सावरला, मात्र त्यानंतर ते दोघेही तंबूत परतल्यावर रैना, धोनी, जडेजा यांनी अर्धशतके झळकावत टीम इंडियाचा चांगला स्कोर उभारला. धोनीने 72 धावा काढल्या.
तर रविंद्र जडेजाने 37 चेंडुंमध्ये नाबाद 61 धावांची खेळी केली. दोघांनी अवघ्या 60 चेंडुंमध्ये 96 धावांची भागीदारी केली. सुरेश रैनाने दमदार अर्धशतक पूर्ण करुन भारताचा डाव सावरला. परंतु, पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात त्याचा त्रिफळा उडाला. त्याने 70 चेंडुंमध्ये 55 धावा काढल्या.
भारताची सावध सुरवात होते आहे. असं वाटत असतानाच टीम इंडियाचा सलामीचे बॅट्समन झटपट तंबूत परतले आहेत. ते पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे भारताची सुरवात खराब झाल्याने मधल्या फळीतील खेळाडूही दबावाखाली खेळताना दिसत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. कोचीमध्ये सुरू असलेल्या या सामान्यात भारताने सावध सुरवात केली आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. गोलंदाज अशोक दिंडाऐवजी शमी अहमदला संघात स्थान देण्यात आलं आहे.
टीम इंडियाच्या मागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र संपायचं नावच घेताना दिसत नाही आहे... पाकिस्तानविरूद्ध वन-डे सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाला इंग्लंडविरूद्ध पहिल्या राजकोट वन-डेत 9 रनने पराभव पचवावा लागला... त्यामुळे टीम इंडियासमोर कोची वन-डे जिंकण्याचं आव्हान असणार आहे...
इंग्लंडविरूद्ध वन-डे सीरिजमध्ये पत वाचवण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचे मनसुबे राजकोट वन-डेत झालेल्या पराभवाने उधळले गेले आहेत... इंग्लंडने रचलेल्या रन्सच्या शिखरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न टीम इंडियाच्या बलाढ्य बॅटिंग लाईनअपने केला... मात्र केलेले प्रयत्न तोकडे पडले आणि पदरी निराशाच पडली...
त्यामुळे कोची वन-डेत विजय मिळवण्याकरता टीम इंडियाच्या सर्वच बॅट्समन्सना जी तोड मेहनत करावी लागणार आहे... राजकोट वन-डेत भारताला 96 रन्सची दमदार ओपनिंग करून दिल्यानंतर...चुकीच्या पद्धतीने आऊट झालेल्या गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे जोडीवर अधिकाधिक वेळ पिचवर उभं राहत वेगाने रन्स करण्याची जबाबदारी असणार आहे... तर तिस-या पोझिशनवर बॅटिंगला येणा-या विराट कोहलीच्या परफॉर्मन्सवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असणार आहेत...
पाकिस्तानविरूद्ध झालेल्या वन-डे सीरिजमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या विराटला कोची वन-डेत दमदार कामगिरी करण्याची संधी असेल... राजकोट वन-डेत विराट केवळ 15 रन्सच करू शकला... मिडल ऑर्डरमध्ये युवराज सिंगचा झंझावात रोखण्याचं आव्हान इंग्लिश बॉलर्सपुढे असणार आहे... राजकोट वन-डेत युवीने धडाकेबाज 61 रन्सची खेळी केली होती..
याआधीचा युवराजचा मायदेशातीस इंग्लंडविरूद्धचा इतिहासही इंग्लंडच्या छातीत धडकी भरवणारा आहे... तर कॅप्टन धोनीसह सुरेश रैनालाही चांगली लय सापडली असली.. तर मोक्याच्या क्षणी पीचवर उभे राहत टीमला मोठं टार्गेट गाठून देण्याची तसेच प्रतिस्पर्ध्यांपुढे मोठं टार्गेट उभारण्याची जबाबदारी या दोघांना पार पाडावी लागेल... तरच टीम इंडियाला इंग्लंडविरूद्ध कोची वन-डेत मोठा विजय साजरा करता येईल...