आपल्या घरात धोनी देणार इंग्लंडला मात?

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरी लढत रांचीमध्ये रंगणार आहे. दुसऱ्या वन-डेत कमबॅक केलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल तर दुसरीकडे विजयाची मालिका खंडित झाल्याने इंग्लंड टीम सावध झाली असेल.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 19, 2013, 09:21 AM IST

www.24taas.com, रांची
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरी लढत रांचीमध्ये रंगणार आहे. दुसऱ्या वन-डेत कमबॅक केलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल तर दुसरीकडे विजयाची मालिका खंडित झाल्याने इंग्लंड टीम सावध झाली असेल.
कोचीमध्ये धोनी अॅन्ड कंपनीनं इंग्लिश ब्रिगेडविरूद्ध जोरदार कमबॅक करत देशावासियांच्या आशा उंचावल्या आहेत. म्हणूनच टीम इंडियासमोर पुन्हा एकदा विजय मिळवून सीरिजमध्ये २-१ नं आघाडी मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे. इंग्लंडविरूद्धची तिसरी लढत ही धोनीच्या घरात म्हणजे रांचीमध्ये होत आहे. यामुळेच धोनी भारताला सीरिजमध्ये आघाडी मिळवून देतो का याकडे साऱ्या देशवासियांचं लक्ष लागून राहिल आहे. धोनी ज्या शहरात राहतो त्या रांचीमधील ‘एचईसी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम’वर प्रथमच इंटरनॅशनल मॅच खेळली जात असल्यानेही या लढतीला एक वलय प्राप्त झालय. बऱ्याच दिवसांनंतर ट्रॅकवर परतलेल्या टीम इंडियाचा कोचीमधील दणदणीत विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला असेल.

दुसऱ्या वन-डेमध्ये चांगली ओपनिंग करून देण्यात अपयशी ठरलेल्या गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणेसमोर मजबूत ओपनिंग देण्याचं आव्हान असेल. तर कोचिमध्ये चांगली कामगिरी करणारे विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीवर मिडल ऑर्डरला पुन्हा एकदा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास आतूर असतील. ऑल राऊंडर रविंद्र जाडेजाचं बॅट आणि बॉलने होणार आक्रमण आव्हान रोखण्याचं आव्हान कूक अॅन्ड कंपनीसमोर असेल. याशिवाय ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या तेज तर्रार बॉलर्सना इंग्लिश बॅट्समनला रोखण्यासाठी रणनिती आखावी लागेल. तर आर. अश्विनला गवसलेला सूर टीम इंडियासाठी नक्कीच दिलासादायक ठरेल.

तर दुसरीकडे इंग्लंड टीम कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल. ऍलिस्टर कूक आणि ईयान बेलवर चांगल्या ओपनिगंची जाबाबदारी असेल. तर मिडल ऑर्डरची भिस्त केविन पीटरसन, ईयॉन मॉर्गन यांच्यावर असेल. स्टिव्हन फिन, जेड डर्नबाकचा भेदक मारा रोखण्याचं आणि जेम्स ट्रेडवेलच्या फिरकापासून सावध राहण्याचं आव्हान टीम इंडियाच्या बॅट्समनमसमोर असेल.

आता धोनीला आपलचं शहर किती लकी ठरत का आणि भारत सीरिजमध्ये आघाडी घेत का? हे पहावं लागेल. तर दुसरीकडे विजयाची मालिका खंडित झाल्याने इंग्लंड टीमही सावध झाली असेल. आता धोनी अॅन्ड कंपनी गवसलेला सूर कायम राखते की इंग्लंड टीम पुन्हा कमबॅक करत पाच वन-डेच्या सीरिजमध्ये आघाडी घेते याकडेच क्रिकेट फॅन्सच लक्ष लागलंय.