पाहा ट्रेलर- `शीख` इरफान खानचा `किस्सा`

आगामी ‘किस्सा: द टेल ऑफ लोनली घोस्ट’ सिनेमात इऱफान खानने पुत्ररत्न प्राप्त व्हावं यासाठी आसूसलेला सरदारजीही तितक्याच दमदारपणे सादर केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 6, 2013, 08:12 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता इरफान खान याने आनेक सिनेमांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. ‘पान सिंग तोमर’ चित्रपटातील त्याचा अभिनय असो, वा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द लंचबॉक्स’ सिनेमातील ‘साजन फर्नांडिस’ हे पात्र असो, इरफानने नेहमीच दमदार अभिनय करत आपल्या टॅलेंट दाखवलं आहे. आगामी ‘किस्सा: द टेल ऑफ लोनली घोस्ट’ सिनेमात इऱफान खानने पुत्ररत्न प्राप्त व्हावं यासाठी आसूसलेला सरदारजीही तितक्याच दमदारपणे सादर केला आहे.
अनुप सिंग दिग्दर्शित ‘किस्सा: द टेल ऑप लोनली घोस्ट’ या सिनेमात इरफान खानने उंबर सिंग या शीख व्यक्तीची भूमिका केली आहे. १९४७ सालच्या भारत- पाकिस्तान फाळणीमध्ये उंबर सिंगला गाव सोडावं लागलं आहे. आपल्याला मुलगा असावा, या विचाराने त्याला इतकं झपाटून टाकलं आहे, की आपल्या चौथ्या मुलीला तो मुलगा म्हणूनच वाढवायला सुरूवात करतो.

या सिनेमात इरफान खानसोबत तिस्का चोप्रा, तिलोत्तमा शोम, रसिका दुग्गल इत्यादीही काम करत आहेत. हा सिनेमा २०१३च्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कंटेम्पररी वर्ल्ड सिनेमा सेक्शनमध्ये दाखवण्यात आला. याचवेळी या सिनेमाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अशियाई सिनमाचा नेटपॅक पुरस्कारही मिळाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.