आमीर खानचं निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण

कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पाठिंबा नसल्याचं आमीर खानने निवडणूक आयोगाला पत्र लिहून सांगितलं आहे.

Updated: Mar 28, 2014, 09:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पाठिंबा नसल्याचं आमीर खानने निवडणूक आयोगाला पत्र लिहून सांगितलं आहे.
आपण आम आदमी पक्ष (आप) तसेच कोणत्याही राजकीय पक्षास पाठिंबा दिला नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
आमीर खान याला `आप`ला पाठिंबा असल्याचे जाहिरातींमधून दाखविण्यात येतयं. ही बाब आमीरच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर आमीरने आयोगास पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे.
`आप`च्या काही नेत्यांनी आमीर खानचा `आप`ला पाठिंबा असल्याचा दावा ट्‌वीटरवरून केला होता. तसेच आमीरचे छायाचित्रही या नेत्यांनी वापरले होते. या पार्श्‍वभूमीवर आमीर याने आपली भूमिका स्पष्ट केलीय.
"पहिल्या दिवसापासूनच माझा कोणत्याही राजकीय पक्षास पाठिंबा नसल्याचं आमीर खानने स्पष्ट केलंय. तसेच तो कोणत्याही पक्षाच्या प्रचारमोहिमेतही सहभागी नाही, असे आमीरच्या प्रवक्‍त्याने म्हटलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.