चिमुकली आराध्या बच्चन करोडोंची मालकीण!

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्याची एक वर्षांची चिमुकली आराध्या बच्चन आता करोडोंची मालकीण बनलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 3, 2013, 12:58 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्याची एक वर्षांची चिमुकली आराध्या बच्चन आता करोडोंची मालकीण बनलीय.
सूत्रांच्या माहितीनुसार, नुकतंच अभि-ऐशनं आपल्या चिमुकलीच्या नावे दुबईत तब्बल ५४ करोडची प्रॉपर्टी विकत घेतलीय. काही दिवसांपूर्वी अभि-ऐशनं आराध्याला एक बीएमडब्ल्यू गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. आराध्यानं नुकतंच वयाच्या पहिल्या वर्षात पाऊल टाकलंय. अंकगणिताबाबतीत चिमुकली आराध्या अजूनही अनभिज्ञ आहे.

आराध्या सध्या आपल्या आजोबा आणि आजीसोबत भोपाळमध्ये आहे. अमिताभ सध्या भोपाळमध्ये प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’ या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. आराध्यानं आपल्या आजीचं माहेर अजून बघितलं नव्हतं त्यामुळे हे एक निमित्तही होतं आराध्याला भोपाळ फिरवून आणण्याचं... यावेळी चिमुरड्या आराध्यानं आजोबांच्या शुटींगमध्येही हजेरी लावली आणि आजीचं माहेरही बघितलं. भोपाळमध्ये पहिल्यांदाच बीग बी आपल्या संपूर्ण परिवारासह आलेत.