ट्विंकलकडून पहिल्यांदाच मिळाली अक्षयला अशी दाद...

गेल्या १२ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर अक्षयला पहिल्यांदाच पत्नी ट्विंकलकडून त्याच्या चांगल्या अभिनयाची पोचपावती मिळालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 14, 2013, 03:55 PM IST

www.zee24taas.com, मुंबई
गेल्या १२ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर अक्षयला पहिल्यांदाच पत्नी ट्विंकलकडून त्याच्या चांगल्या अभिनयाची पोचपावती मिळालीय. ही पोचपावती त्याच्यासाठी नक्कीच खास होती, कारण ट्विंकलनं चक्क स्टॅण्डींग ओव्हीएशन देऊन त्याच्या अभिनयाला ही दाद दिलीय.
निरज पांडे दिग्दर्शित ‘स्पेशल २६’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. याच स्पेशल २६ चं एक खास स्क्रिनिंग अक्षयनं त्याच्या पत्नीसाठी आयोजित केलं होतं. हा चित्रपट पाहिल्यानंतर ट्विंकलनं चक्क उभं राहून अक्षयसाठी टाळ्या वाजवल्या. ट्विंकल म्हणते, ‘स्पेशल २६ या चित्रपटात अक्षयनं खूपच चांगला अभिनय केलाय. आमच्या लग्नाला आता १२ वर्ष झालीत. पण, या १२ वर्षांत पहिल्यांदाच अक्षयच्या अभिनयानं मला भारावून टाकलंय’.

‘स्पेशल २६’ ला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून अक्षयही खूश आहे. ‘एक अभिनेता म्हणून सतत काहितरी नवीन देण्याचा आपला प्रयत्न असतो, प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघून मलाही खूप बरं वाटतंय आणि या सिनेमाला खरोखरच दाद मिळायला हवी’ असं अक्षयनं म्हटलंय.