www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
सिने अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या विरोधात अहमदनगर जिल्हा न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ‘जंजीर’ चित्रपटात ‘मुंबई के हिरो’ या गाण्यात पोलिसांचे कपडे आणि मोनोग्राम वापरून लज्जा उत्पन होईल असे नृत्य केल्या प्रकरणी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि चित्रपट निर्माता पुनित मेहरासह ५ जणांविरोधात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल झाली असून लवकरच अभिनेत्री प्रियांका चोप्राला समन्स नोटीस निघेल.
नगर येथील पोलिस नाईक संजीव पाटोळे यांच्या मुलाने गाणे पाहत असताना आपले साहेब असे कपडे घालतात का हा प्रश्न उपस्थित केल्याने पाटोळे निरुउत्तर झाले त्यांनी या संदर्भात C.R.P.C कलम १५४ प्रमाणे तोफखाना पोलिस स्टेशन मध्ये या विषयाची माहिती देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलिस स्टेशनने फिर्याद नोंदून घेण्यास नकार दिला. पोलिसच पोलिसांच्या बदनामीला साथ देत नाही हे पाहून पाटोळे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.
‘जंजीर’ या चित्रपटातील ‘मुंबई के हिरो’ या गाण्यातील अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता रामचरण तेज यांनी वापरलेल्या खाकी गणवेशावरील लावलेल्या महाराष्ट्र पोलिस दलाच्या लोगो तिरंगी झेंडा भारतीय राज मुद्रा लावण्यावर अक्षेप घेऊन त्याच्या विरोधात जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.