www.24taas.com झी मीडिया, मुंबई
दिग्दर्शक करण मल्होत्राच्या येणाऱ्या ‘शुध्दी’ या नवीन चित्रपटासाठी शेवटी हृतिक रोशन आणि करीना कपूर या जोडीवर शिक्कामोर्तब केले गेले. दहा वर्षानंतर पुन्हा एकदा हृतिक आणि करीना एकत्र काम करतांना दिसणार आहे.
‘शुध्दी’ चित्रपटात हृतिकबरोबर कोणती अभिनेत्री काम करणार या चर्चेत अखेर करीना कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. करण मल्होत्रा पत्रकाराशी संवाद साधतांना म्हणाले की, करीना कपूर प्रमुख भूमिकेत काम करणार आहे. ‘शुध्दी’ या चित्रपटाविषयी जास्त काही न बोलता मल्होत्रा म्हणाले की, या चित्रपटात करिना आणि हृतिक एका नवीन रुपात आपल्यासमोर येणार आहेत.
हृतिक आणि करीनाने याच्या आधी करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात काम केले होते आणि तो चित्रपट हिट झाल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये आलेल्या ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ या चित्रपटात काम केले, पण हा चित्रपट फ्लॉप झाला आणि आता तब्बल दहा वर्षानंतर हृतिक आणि करीना एकत्र काम करणार आहेत.
दहा वर्षानंतर पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. या आधी केलेल्या काही चित्रपटाच्या निराशेनंतर आता ही जोडी नवीन रूपाने आपल्यासमोर येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.