सल्लू म्हणतो, दबगं २ पाहाच, दबंगपेक्षा आहे वेगळाच...

सुपरस्टार सलमान खानच्या `दबंग` या सिनेमाने बॉलीवूडमध्ये चांगलीच धम्माल उडवून दिली होती. त्यामुळे सलमानच्या दबंग २ कडे सगळ्यांचेच डोळे लागून राहिले आहेत.

Updated: Dec 1, 2012, 04:47 PM IST

www.24taas.com, मुंबई
सुपरस्टार सलमान खानच्या `दबंग` या सिनेमाने बॉलीवूडमध्ये चांगलीच धम्माल उडवून दिली होती. त्यामुळे सलमानच्या दबंग २ कडे सगळ्यांचेच डोळे लागून राहिले आहेत. तर सलमान स्वत:ही म्हणतो की, दबंग पेक्षा दबंग-२ नक्कीच वेगळा असणार आहे. बिग बॉस या रियालिटी शोच्या सेटवर सलमानने सांगितले की, ह्या एकाच शैलीतील दोन वेगवेगळे सिनेमे आहेत.
सल्लूला विचारलं गेलं की, या सिनेमाच्या प्रमोशनसाठी `बिग बॉस` या रियालिटी शोलाच का निवडण्यात आलं? तेव्ह सलमान म्हणाला की, मी `बिग बॉस`चा निवेदक आहे. आणि चॅनेलला वाटलं की, मी असं करावं म्हणून ह्याचं प्रमोशन मी असं करतो आहे.

अरबाज खान दिग्दर्शित दबंग २ ह्या सिनेमात सोनाक्षी सिन्हा मुख्य भुमुकिते आहे. हा सिनेमा २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे.