दिव्या भारतीच्या बहिणीला मिळणार यश?

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती अगदी काही चित्रपटांमध्ये झळकली. पण तिनं सगळ्यांच्याच मनावर राज्य केलं. तमिळ चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या दिव्या भारतीनं वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आता तिची बहीण कायनात अरोरा चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी धडपड करतेय.

Updated: Aug 28, 2013, 05:24 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती अगदी काही चित्रपटांमध्ये झळकली. पण तिनं सगळ्यांच्याच मनावर राज्य केलं. तमिळ चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या दिव्या भारतीनं वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आता तिची बहीण कायनात अरोरा चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी धडपड करतेय.
आपला चेहरा आणि अभिनयानं आजही प्रेक्षकांच्या मनात असलेल्या दिव्या भारतीनं कमी पण हीट चित्रपट दिले. ‘ शोला और शबनम’, ‘दिवाना’ अशा अनेक चित्रपटातून तिनं यश संपादन केलं. ‘‘विश्वात्मा’ या चित्रपटाद्वारं तिनं हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश मिळवला आणि ‘साता समुद्रापार गेली.
आता दिव्यानंतर तिची बहिण कायनात सिनेमासृष्टीत आलीय. ती प्रथम अक्षय कुमारच्या २०१० मधील‘खट्टा मिठ्ठा’या चित्रपटात आयटम नंबर वन दिसली. बराच काळानंतर आता ती पुन्हा नवीन चित्रपटात काम करणार आहे.‘ग्रॅण्ड मस्ती’या चित्रपटातून कायनात मोठ्या पडद्यावर काम करतांना दिसणार आहे.
ग्रॅण्ड मस्ती या चित्रपटातून कायनात आता अभिनेत्रीच्या रुपात झळकणार आहे. या चित्रपटातून ती आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. या चित्रपटात ती विवेक ओबेरॉयच्या विरुद्ध असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.