HOT- रणवीर सिंगचे अनेक मुलींसोबत शरीरसंबंध!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने नुकतंच एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आपण आयुष्यात बऱ्याच महिलांसोबत शय्यासोबत केली असल्याची कबुली त्याने एका वर्तमानपत्राला दिली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 5, 2013, 07:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने नुकतंच एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आपण आयुष्यात बऱ्याच महिलांसोबत शय्यासोबत केली असल्याची कबुली त्याने एका वर्तमानपत्राला दिली.
मी आत्तापर्यंत बऱ्याच स्त्रियांसोबत वन-नाइट-स्टँड (एका रात्रीपुरताचे शरीरसंबंध) केलेलं आहे, मात्र लग्नाबद्दल मी अजूनही ठाम नाही असं रणवीर सिंगने म्हटलं आहे. माझा लग्नाचा कुठलाही विचार नाही. पण मी लग्न केलंच, तर लग्नानंतर मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करेन असं रणवीर सिंग म्हणाला. निदान मुलासाठी तरी मी लग्न करेन. कारण मुलांच्या वाढीसाठी वडिलांसोबत आईचीही गरज पडते.

रणवीर सिंगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून त्याचे आधी अनुष्का शर्मासोबत आणि सध्या दीपिका पादुकोणसोबत प्रेम संबंध आहेत. काही काळ सोनाक्षी सिन्हासोबतही त्याच्या अफेअरची चर्चा होती. त्यामुळे त्याने केलेलं वक्तव्य हे सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.