www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुझान आणि ह्रतिक रोशन यांचा १३ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असल्याचं आता उघड झालंय... सुझाननं हे उघड केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वैवाहिक जीवनानाबद्दल आणि सुझानबद्दल ह्रतिकनं प्रतिक्रिया दिलीय. त्यानं फेसबुकवर अजुनही आपण सुझानवर नितांत प्रेम करत असल्याचं म्हटलंय.
सुझान कायम माझ्या जीवनातलं प्रेम बनून राहील, असं ह्रतिकनं फेसबुकवर म्हटलंय. ‘ही प्रेमाला माझी श्रद्धांजली असेल. सुझान माझं प्रेम आहे आण आजीवन माझ्या आयुष्यातलं प्रेम राहील. जर तिच्या चेहऱ्यावर माझ्याविना हसू दिसत असेल तर माझं प्रेम तिच्यासाठी हे जरूर करेल... कोणत्याही अटीविना’ (This is my greatest tribute to love. Sussanne is and always will be the love of my life for the rest of my life. If her smiles are brighter without me my love for her must accomplish that. Unconditional.) असं ह्रतिकनं म्हटलंय.
२० डिसेंबर २००० रोजी ह्रतिक आणि सुझान आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देत विवाहबंधनात अडकले होते. ऋतिकनं शुक्रवारी आपलं वैवाहिक जीवनातील वादळ लोकांसमोर न येऊ देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, शुक्रवारी आपण सगळ्याच प्रयत्नानंतर अपयशी राहिल्याचं त्यानं एका मुलाखतीत म्हटलं. ‘सुझाननं माझ्यापासून वेगळं होण्याचा आणि आमच्या १७ वर्षांच्या नात्याला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय. संपुर्ण कुटुंबासाठी हा एक दु:खद क्षण आहे. मी मीडिया आणि लोकांना विनंती करतो की, याक्षणी आम्हाला एकटं सोडावं’ असं ३९ वर्षीय अभिनेत्यानं यावेळी म्हटलं.
दरम्यान, ३५ वर्षीय सुझाननं ‘आम्ही दोघं दोन वेगळी व्यक्तीमत्व आहोत, जे एकमेकांचा सन्मान करतात आणि आम्ही आपापले व्यक्तीगत निर्णय घेतले आहेत. आम्ही दोघं उत्कृष्ट (पुन्हा एकदा उत्कृष्ट) मुलांचे आई-वडील आहेत आणि त्यांची काळजी आणि सुरक्षितता ही यानंतरदेखील आमचीच जबाबदारी राहील. त्याला कुणीही बदलू शकत नाही’ असं म्हटलंय.
अभनेते संजय खान यांची मुलगी आणि इंटिरीअर डिझायनर सुझाननं या वादळालं व्यक्तीगत आवडीचं कारण दिलंय. सुझान आणि ह्रतिकला रेहान (७ वर्ष) आणि रिधान (५ वर्ष) अशी दोन मुले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.