www.24taas.com, चेन्नई
कमल हसनच्या विश्वरुपम सिनेमाला मद्रास हायकोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळे उद्या हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकणार नाही.
मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतल्याने सरकारने ही बंदी घातली होती. 28 जानेवारीला न्यायाधीश सिनेमा पाहून निर्णय घेण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत ‘विश्वरुपम’ सिनेमाला घातलेल्या बंदीविरोधात सिनेमाचा दिग्दर्शक-अभिनेता कमल हसन याने हायकोर्टात धाव घेतली होती. सिनेमाला होणारा विरोध हा सांस्कृतीक दहशतवाद असल्याचं कमल हसन याचं म्हणणं आहे.
‘विश्वरूपम’ या सिनेमात मुसलमान समाजाचं चुकीचं दर्शन घडवलं गेलं असल्याची तक्रार सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच काही मुस्लिम संघटनांकडून होऊ लागली. मात्र यावर बोलताना कमल हासन यांनी स्पष्ट केलं होतं, की जगभरातले मुसलमान हा सिनेमा पाहून खूष होतील, आणि मला पुढच्या ईदला मला बिर्याणी पाठवतील.