करीना कपूरचा लग्नानंतर `सत्याग्रह`

सैफ अली खानशी लगीनगाठ मारल्यानंतर करीना कपूर लग्नानंतर `सत्याग्रह` करणार आहे. हा `सत्याग्रह` सैफविरोधात नाही तर तो तिचा नवीन चित्रपट आहे. या पहिल्या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 12, 2012, 08:38 AM IST

www.24taas.com,मुंबई
सैफ अली खानशी लगीनगाठ मारल्यानंतर करीना कपूर लग्नानंतर `सत्याग्रह` करणार आहे. हा `सत्याग्रह` सैफविरोधात नाही तर तो तिचा नवीन चित्रपट आहे. या पहिल्या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटामध्ये करीना सीएनएनच्या अनुभवी पत्रकार क्रिस्टिएन अमानपुर यांची भूमिका साकारणार आहे. दिवाळीनंतर प्रकाश झा यांच्या `सत्याग्रह` चित्रपटाचे शुटिंग सुरु होणार आहे.
लग्नानंतर करीनाने सलमान खानच्या `दबंग-२` या चित्रपटात आयटम साँगचे करणार आहे. त्याचे शुटींगही झाले आहे. सूत्रांच्या माहिती नुसार करीना सध्या क्रिस्टिएनच्या रिपोर्टींग संदर्भात अभ्यास करीत आहे.