`मी रणबीरसोबत ना साखरपुडा करतेय, ना लग्न`

अभिनेत्री कतरीना कैफ आणि रमबीर कपूर यांची जोडी जमली, अशा आशयाची चर्चा आता जोर धरू लागलीय. पण, खुद्द कतरीनानं मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 11, 2013, 03:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री कतरीना कैफ आणि रमबीर कपूर यांची जोडी जमली, अशा आशयाची चर्चा आता जोर धरू लागलीय. पण, खुद्द कतरीनानं मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय. आपण रणबीर कपूरशी ना साखरपुडा करत आहोत, ना लग्न... पण, मला त्याच्या लग्नात नाचायला मात्र नक्की आवडेल, असं कतरीनानं म्हटलंय.
कतरीनाला तिच्या आणि रणबीरच्या संबंधांवियी प्रश्न विचारला गेला तेव्हा तीनं, ‘मी आत्ताच कुणाशीही लग्न किंवा साखरपुडा करणार नाही... आणि याला तुम्ही माझा पक्का निर्णय माना.... मी कुणाशीही लग्न करत नाहीए. मला माहीत नाही की माझं लग्न पुढच्या १० वर्षांत होईल की २०...’ असं उत्तर दिलंय. यावर रणबीरचं लग्न तिच्याशी झालं नाही तर कुणाशी व्हावं असं तिला वाटतं हा प्रश्न विचारला गेला. यावर कतरीनानं, त्याला जी मुलगी आवडेल तिच्याशी त्यानं लग्न करावं, असं उत्तर दिलंय.
रणबीरच्या लग्नात नाचायला तुला आवडेल का? असा प्रश्न कतरीनाला विचारला गेला तेव्हा कतरीनानं म्हटलं, होय, रणबीरचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘बेशरम’मधल्या एका फेमस गाण्यावर मला डान्स करायला आवडेल. करीनानं एका टीव्ही शो दरम्यान कतरीनाला ‘वहिणी’ म्हणून संबोधलं होतं, याविषयी कतरीनाला विचारलं तेव्हा, करीनानं हे गंमतीमध्ये म्हटलं होतं आणि त्याला जास्त गंभीर स्वरुप देऊ नये, असं म्हटलंय.
करीनानं ‘कॉफी विथ करन’ या शो दरम्यान चित्रपट निर्माता करण जौहर यानं विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कतरीनाल आपली होणारी वहिनी, म्हणजेच रणबीरची पत्नी असं संबोधलं होतं. या कार्यक्रमात करीना आणि रणबीर एकत्र दिसले होते. करीना संबंधी कतरीनाला विचारलं गेलं, तेव्हा कतरीनानं ‘मला माहीत नाही... ती दोघं बहिण – भाऊ आहेत. एकमेकांचे गंमत करण्याची दोघांमध्ये स्पर्धा सुरू असते... तीने जे म्हटलं ते सगळ गंमतीमध्ये म्हटलं होतं’ असं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.