दादा शब्द जरा जपून वापरा - नाना पाटेकर

राज्य सरकारच्या पन्नासाव्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेता नाना पाटेकरना राज कपूर विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Updated: May 3, 2013, 01:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य सरकारच्या पन्नासाव्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेता नाना पाटेकरना राज कपूर विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याच निमित्ताने नानाने दुष्काळग्रस्तांना 10 लाखांची मदत देऊ केलीये. तर अजितदादांनाही अप्रत्यक्षपणे शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला.
राज्य सरकारचा पन्नासावा चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. अभिनेता नाना पाटेकर, हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेले दिग्दर्शक बासू चटर्जी, अभिनेत्री रीमा लागू आणि रंगभूषाकार पंढरीनाथ यांचा यानिमित्ताने विशेष गौरव करण्यात आला....

पन्नासावा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईत अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त हिंदी सिनेमा गाजवलेले दिग्दर्शक आणि अनेक सुपरहिट सिनेमा दिलेले दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार तर रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांना व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं... अभिनेता नाना पाटेकर यांना राज कपूर विशेष पुरस्कार तर हिंदी सिनेमातली सुपरहिट मॉम रीमा लागू यांना व्ही.शांताराम विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला..

महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श सिनेमानं प्रथम पुरस्कार पटकावत पुन्हा एकदा बाजी मारली.. अरुण नलावडे, विजय पाटकर,मृण्मयी देशपांडे आदींना राज्य सरकारच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींच्या परफॉर्मन्ससोबतच उपमुख्य़मंत्री अजित पवार आणि अभिनेता नाना पाटेकर यांच्यातली जुगलबंदीही चांगलीच रंगलेली उपस्थितांना पाहायला मिळाली.