'जब्या'ची कोणती गोष्ट `प्राजक्ता`ला आवडली?

जब्याच्या आजीनं उल्हासनगरमध्ये थिएटरात जाऊन `फॅण्ड्री` बघितला, ही गोष्ट `टाईमपास`मधल्या `प्राजक्ता`लाही आवडलीय. मात्र दगडूला हे किती आवडेल हे सांगता येणार नाही.

Updated: Feb 21, 2014, 12:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जब्याच्या आजीनं उल्हासनगरमध्ये थिएटरात जाऊन `फॅण्ड्री` बघितला, ही गोष्ट `टाईमपास`मधल्या `प्राजक्ता`लाही आवडलीय. मात्र दगडूला हे किती आवडेल हे सांगता येणार नाही.
जब्याच्या आजीनं सिनेमा पाहिल्याची बातमी `24taas.com`वर झळकली आणि `टाईमपास`मधल्या प्राजक्तांन @zee24taasnewsचं ट्वीट रिट्वीट केलंय.
अभिनेत्री आणि गायक केतकी माटेगांवकरने हे ट्वीट फेवरीट नमूद केलंय, तसेच रिट्वीटही केलं आहे.
एकंदरीत प्राजक्ताला शालू-जब्याच्या केमिस्ट्रीपासून अजिबात जेलसी वाटत नाहीय.
दगडू आणि प्राजक्ताची केमेस्ट्री मराठी प्रेक्षकांना भावली, तशी शालू आणि जब्याचीही जोडीही प्रेक्षकांच्या मनात उतरली आणि हूरहूर लावून गेली.
`टाईमपास`चा हिरो दगडू म्हणजेच प्रथमेश परब, प्राजक्ताची भूमिका साकारणारी केतकी माटेगांवकरने तर फॅण्ड्रीत शालू साकारलीय राजेश्वरी खरातने. दगडूप्रमाणे जब्याची भूमिका सोमनाथ अवघडेने पार पाडलीय.
ही सर्व मंडळी मराठी सिनेमातली एक नवी पिढीच म्हणावी लागेल, यात त्यात ते एकमेकांच्या सिनेमाचं कौतुक करतायत, हे आणखी एक विशेष.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.