गळा दाबल्याने सनी लिओन अत्यवस्थ

पोर्नस्टार सनी लिओन अत्यवस्थ आहे. तुम्ही वाचूक थबकलात ना. हो खरचं ती अत्यवस्थ आहे. तिचा गळा दाबल्याने ती अत्यवस्थ झाली. मात्र, बाकी प्रसंग सुदैवाने टळला.

Updated: Feb 28, 2014, 04:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, क्वालाम्लपूर
पोर्नस्टार सनी लिओन अत्यवस्थ आहे. तुम्ही वाचूक थबकलात ना. हो खरचं ती अत्यवस्थ आहे. तिचा गळा दाबल्याने ती अत्यवस्थ झाली. मात्र, बाकी प्रसंग सुदैवाने टळला.
मलेशियामध्ये एका चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली. देवांग ढोलकिया निर्मित `टीना अॅण्ड लोलो` या चित्रपटाचे शुटींग सुरू आहे. त्यावेळी एका दृश्याचे चित्रिकरण सुरू असताना हा प्रकार घडला. `टीना अॅण्ड लोलो` या सिनेमात सनी करिश्मा तन्ना सोबत दिसणार आहेत. या चित्रपटात खलनायकाची भूमिका दीपक तिजोरी साकारत आहे.
दीपक सनीचा गळा दाबून तिला जमीनीवरुन घसरत नेण्याचा सीन होता. या सीनचं शुटींग सुरू असताना दीपकने सनीचा गळा जोरात दाबला की, त्यामुळे सनी खरचं अत्यवस्थ झाली. सुदैवाने ही बाब अॅक्शन संचालकाच्या लक्षात आल्याने त्याने ताबडतोब शुटींग थांबवलं आणि सनीने मोकळा श्वास घेतला.
दीपकबरोबर सीन करत असताना सनीचा बॅंलन्स गेला. त्यामुळे ही घटना घडल्याचे दीपकने स्पष्ट केले. या घटनेबद्दल दीपकने सनीची तात्काळ माफी मागितली, अशी माहिती देवांगने सांगितली.
या चित्रपटाबाबत देवांगने सांगितले की, या चित्रपटासाठी एका जबरदस्त खलनायकांची गरज होती. दीपक हा खलनायकाच्या भूमिकेसाठी योग्य असल्याने त्याची निवड केली. दीपक हा बऱ्याच काळाने पुन्हा एकदा चित्रपटांच्या पडद्यावर झळकणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.