आता रजनीकांतचा `स्टाइल डे`

सुपरस्टार रजनीकांतची किर्ती आता सातासमुद्रापार पोहचली आहे. तो केवळ दक्षिणेपुरता उरलेला नाही. त्या ही किर्ती जपानपासून अरब-अमिरातीपर्यंत पसरली आहे. रजनी हाच चाहत्यांचा धर्म आहे आणि तोच त्यांचा आदर्श झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 13, 2012, 03:22 PM IST

www.24taas.com,मुंबई
सुपरस्टार रजनीकांतची किर्ती आता सातासमुद्रापार पोहचली आहे. तो केवळ दक्षिणेपुरता उरलेला नाही. त्या ही किर्ती जपानपासून अरब-अमिरातीपर्यंत पसरली आहे. रजनी हाच चाहत्यांचा धर्म आहे आणि तोच त्यांचा आदर्श झालाय.

सुपस्टार रजनीकांतला १२ डिसेंबरला ६१ वर्षं पूर्ण होत आहेत. या सुपरस्टारची एकसष्ठी जोरात साजरी करण्यासाठी हे सगळे ‘रजनी फॅन क्लब’ एकत्र आलेत. हा दिवस ‘स्टाइल डे’ म्हणून साजरा करावा असा त्यांचा खल सुरू आहे. ते आतापासून या कामाला लागले आहेत.
जगभरातल्या या क्लबची संख्या जाते ६३ हजारांवर पोहोचली आहे. या सर्वांनी एकमुखाने ही मागणी केलीय. म्हणजे रजनीची गॉगल घालण्याची स्टाइल असो , नाणं उडवण्याची स्टाइल , बंदूक धरण्याची स्टाइल किंवा अगदी सिगारेट शिलगावण्याची स्टाइल असो.. रजनीने प्रत्येकाला वेडं केलंय.
‘रजनी फॅन क्लब’ने एक नामी युक्ती शोधली आहे. रजनीकांत फॅन्सनी त्याच्या वाढदिनी नव्या स्टाइल्स लाँच व्हाव्यात अशी ईच्छा व्यक्त केलीय. रजनीकांत ‘स्टाइल डे’ साजरा व्हाया यासाठी ते प्रयत्नात आहेत. आता त्यासाठी त्यांना किमान दक्षिणेतल्या राज्यांची परवानगी घ्यावी लागेल. त्याचं पुढे काय होईल , ते माहीत नाही. पण , या निमित्ताने रजनीचे जगभरातले सगळे चाहते एका मुद्द्यावर एकत्र आले हेही काही रजनीकांतसाठी कमी नाही.