रणबीर कपूरचा `बॉम्बे वेलवेट`चा लूक लीक

रणबीर कपूरचा `बॉम्बे वेलवेट` या सिनेमातला लूक लीक झाला आहे. रणबीरच्या या फोटोत रणबीर बिझनेस टायकूनमध्ये दिसून आला आहे.

Updated: Apr 8, 2014, 06:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रणबीर कपूरचा `बॉम्बे वेलवेट` या सिनेमातला लूक लीक झाला आहे. रणबीरच्या या फोटोत रणबीर बिझनेस टायकूनमध्ये दिसून आला आहे.

निर्मात्यांना रणबीरचा हा लूक सिक्रेट ठेवायचा होता, पण काल मुंबईच्या फिल्मीस्थान स्टुडियोमध्ये या चित्रपटाचं फोटोशूट सुरु असतांना, मुंबई मिररच्या फोटोग्राफरने रणबीरला कॅमेऱ्यात कैद केलं. एक स्ट्रीट फायटर ते बिझनेट फायटर असा त्याचा प्रवास दाखवण्यात आलाय, तर रणबीर जॉनी बलराजची भूमिका साकारत आहे.

रणबीरला या सिनेमातील फायटरच्या लूकसाठी फार मेहनत करावी लागली. चित्रपटात रणबीर रफ अँड टफ दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

`बॉम्बे वेलवेट` हा सिनेमा माझ्या करिअरचा टायटॅनिक आहे, असल्याचं मत रणबीरने व्यक्त केलंय.

अनुराग कश्यप हा या चित्रपटाचा दिग्दर्शक असून सिनेमा ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. तसेच या सिनेमात रणबीरच्या अपोझिट अनुष्का शर्मा दिसणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.