www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`हिट अॅन्ड रन` प्रकरणात मुंबई सेशन कोर्टानं बॉलिवूड कलाकार सलमान खानविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केलाय.
कोर्टाच्या जजची दुसरीकडे बदली करण्यात आल्यानं गेल्या वेळी सुनावणी टळली गेल्याचं सांगण्यात आलं होतं. आज आरोप निश्चिती होणार असल्यानं सलमान खानही कोर्टात हजर झाला होता. परंतु, यापुढील सुनावणीत त्याला कोर्टात उपस्थित राहणं बंधनकारक नसेल. परंतु, आवश्यकता असेल तर सलमानला कोर्टात हजर राहायला सांगितलं जाऊ शकतं. या प्रकरणात सलमानवर दोष सिद्ध झाले तर त्याला १० वर्षांची शिक्षाही होऊ शकते.
मुंबई सेशन कोर्टात आता सलमान खानविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे. यापूर्वी गेली कित्येक वर्ष सलमान खानविरुद्ध बेजाबदारपणे गाडी चालवल्याचा खटला मुंबईच्या बांद्रा कोर्टात सुरू होता. परंतु, मिळालेले पुरावे लक्षात घेऊन कोर्टानं सलमानविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा खटला भरण्याचे आदेश दिले होते.
सप्टेंबर २००२मध्ये दारुच्या नशेत वेगात गाडी चालवणाऱ्या सलमाननं आपल्या गाडीखाली पाच जणांना चिरडलं होतं. गाडीच्या वेगावर नियंत्रण न मिळवता आलेल्या सलमानच्या गाडीखाली सापडलेल्या या पाच जणांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर इतर चार जण गंभीर जखमी झाले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.