www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पत्नी मान्यताच्या उपचारांसाठी तुरूंगाबाहेरवर असलेल्या संजय दत्तच्या पॅरोलची मुदत आज संपत आहे. पत्नी मान्यताच्या आजारासाठी संजय दत्त २१ डिसेंबरपासून पॅरोलवर आहे.
सुरुवातीला ६० दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाल्यानं २१ फेब्रुवारीला तो तुरूंगात परतणं अपेक्षित होतं. पण त्यानंतर त्याने परत पत्नीच्या आजारपणाचं आणि आपल्या तान्ह्या जुळ्या मुलांच्या संगोपनाचं कारण देत पॅरोल २१ मार्चपर्यंत वाढवला होता.
याचाच अर्थ, संजय दत्त २१ डिसेंबर ते २१ मार्च म्हणजेच तब्बल तीन महिने तुरूंगाच्या बाहेर आहे. मात्र, आता त्याच्या पॅरोलची वाढीव मुदतही संपलीय. त्यामुळे संजय आज तुरुंगात परण्याची शक्यता आहे.
जेल मॅन्युअल्सच्या नियमांनुसार, एखाद्या कैद्याला जास्तीत जास्त ९० दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली जाऊ शकते. संजय दत्त याची ९० दिवसांची पॅरोल रजा २१ मार्च रोजी संपतेय. म्हणजेच, नियमांनुसार २१ मार्चनंतर संजयची पॅरोल रजा वाढविता येऊ शकत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.