www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या सरोगेट बाळाच्या नावाला पुष्टी दिलीय. शाहरुखच्या या तिसऱ्या अपत्याचं नाव ठेवलं गेलंय ‘अबराम’.
शाहरुखचं सरोगेट बाळ जन्माला येणार ही बातमी पसरल्यानंतर अनेक वाद निर्माण झाले होते. पण, या वादानंतर शाहरुखनं पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. शाहरुख खान आणि गौरी खान यांनी आपल्या या बाळाचं नाव ‘अबराम’ असं ठेवण्यात आलंय. सरोगेट पद्धतीनं जन्माला आलेल्या आपल्या मुलाबद्दल शाहरुखनं पहिल्यांदाच मौन सोडलंय.
या बाळाचं लिंग परिक्षण केल्याच्या वृत्ताला यावेळी शाहरुखनं साफ नकार दिलाय. बाळाचा जन्म वेळेअगोदरच झाला होता. त्यामुळे पत्नी गौरी आणि आपल्या संपुर्ण परिवारासह शाहरुख या बाळाची काळजी घेण्यात व्यस्त होता. बाळाच्या स्वास्थ्याची चिंता सतावत असल्यानं आपण शांत राहिल्याचंही शाहरुखनं स्पष्ट केलंय.
परंतु, आता मात्र बाळाची तब्येत सुधारतेय. आता बाळाला घरीही आणण्यात आलंय. शाहरुखनं आपलं बाळ सुखरुप आपल्या हातात दिल्याबद्दल डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफचे आभार मानलेत.
छोट्या पडद्यावर ‘फौजी’ या मालिकेतून १९९८ मध्ये शाहरुखनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. १९९१ मध्ये तो गौरीबरोबर विवाहबंधनात अडकला. शाहरुख आणि गौरीला या सरोगेट बाळाच्या अगोदर आर्यन (१६ वर्ष) आणि सुहाना (१३ वर्ष) अशी दोन मुलं आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.