ती डॉक्युमेंन्ट्री पाहून शाहरूख रडला

शाहरूख खान किती हळवा आहे, हा अनुभव नुकताच सर्वांना आलाय. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स टीमवर एक डॉक्युमेंन्ट्री बनवण्यात आली आहे.

Updated: Feb 21, 2014, 02:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शाहरूख खान किती हळवा आहे, हा अनुभव नुकताच सर्वांना आलाय. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स टीमवर एक डॉक्युमेंन्ट्री बनवण्यात आली आहे.
या डॉक्युमेन्ट्रीतील काही भाग पाहून शाहरूख भावूक झाला आणि त्याला रडू कोसळलं, ही डॉक्युमेन्ट्री लवकरच प्रसारण एक चॅनेलवर केलं जाणार आहे.
शाहरूखने नंतर मनोरंजन जगतातील पत्रकारांशी बोलतांना सांगितलं, मी आपल्या भावनांना आवर घालू शकलो नाही, जेव्हा आम्ही आयपीएलचा अंतिम सामना जिंकला होता, तो माझ्यासाठी मोठ्या आनंदाचा क्षण होता.
शाहरूखने सांगितलं, एकदा त्यांची टीम लागोपाठ नऊ सामने हरली होती, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं, पण मी माझं दु:ख कुणालाही सांगितलं नाही.
मला माहित होतं की माझ्या टीमच्या लोकांनी मेहनत केली आहे आणि ते काही सामना ठरवून हरलेले नाहीत.
शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि जुही चावला यांनी भागीदारीत २००८ मध्ये आयपीएल कोलकाता नाईट रायडर्स टीम विकत घेतली होती.
या टीमने गौतम गंभीर कर्णधार असतांना २०१२ साली आयपीएलचा अंतिम सामना जिकंला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.