तयार व्हा सनी लिऑनचं मराठी ऐकायला!

`रागिनी एमएमएस टू`मधून सनी लिऑनचं मोडकं तोडकं हिंदी ऐकून झालं असेल तर आता तयार व्हा सनीचं मराठी ऐकायला... कारण, लवकरच सुजय डहाके याच्या एका मराठी चित्रपटात सनी लिऑन दिसण्याची शक्यता निर्माण झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 2, 2014, 06:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`रागिनी एमएमएस टू`मधून सनी लिऑनचं मोडकं तोडकं हिंदी ऐकून झालं असेल तर आता तयार व्हा सनीचं मराठी ऐकायला... कारण, लवकरच सुजय डहाके याच्या एका मराठी चित्रपटात सनी लिऑन दिसण्याची शक्यता निर्माण झालीय.
पॉर्न स्टार म्हणून ओळख असलेली अभिनेत्री सनी लिऑन हिला नजरेसमोर ठेऊन राष्ट्रीय पुरस्कारविजेता दिग्दर्शक सुजय डहाके यानं पुण्यातील एका सत्य घटनेवर चित्रपट बनवण्याची योजना आखलीय. प्रतिक्षा आहे ती केवळ सनीनं या चित्रपटात काम करण्यास होकार देण्याची...
`वल्गर अॅक्टिव्हिटीज इनकॉर्प` ऊर्फ `अश्‍लील उद्योग मित्रमंडळ` अशा नावाच्या चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सनी लिऑनला नजरेसमोर ठेवून लिहिल्या गेलेल्या या चित्रपटासाठी स्क्रीप्ट पूर्ण झाल्या झाल्या सनीशी संपर्क साधला जाईल आणि तिचा होकार मिळताच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
दिग्दर्शक सुजय डहाके याच्या `शाळा` या चित्रपटानं अनेक पुरस्कार तर प्राप्त केलेच पण आंतरराष्ट्रीय ख्यातीही मिळवली होती. तर सुजयचाच `आजोबा` हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. तरच सुजयनं त्यानंतर करायच्या कामांचीही आखणी करून ठेवलीय.
`वल्गर अॅक्टिव्हिटीज इनकॉर्प` या चित्रपटाची पटकथा आणि संवाद धर्मकीर्ती सुमंत लिहीत आहे. २०१२ मध्ये सनी लिऑन पुण्यातील दहीहंडी उत्सवाला गेली होती. त्या वेळी तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची अमाप गर्दी उसळली होती. एक पॉर्न स्टार दहीहंडी उत्सवाला कशी काय उपस्थित राहिली. तिला आणण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करण्यात आले होते. या गोष्टी चित्रपटामध्ये मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटाची कथा तीन मुलांभोवती फिरणारी आहे. ही तीन मुले सनी लिऑनला दहीहंडी उत्सवाला आणतात. ती कशा प्रकारे आणतात. मग समाज कशा पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतो, अशा आशयाची या चित्रपटाची कथा आहे.
ही कथाच सनीबेतलेली असल्यामुळे पहिल्यांदा तिच्याशीच यासाठी संपर्क केला जाईल, असं डहाके यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.