सलमान खान सोबत काय करायचं सनी लिऑनला?

२००५मध्ये आलेल्या नो एन्ट्री चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ या चित्रपटात १० अभिनेत्री काम करणार आहेत. यात लारा दत्ता, बिपाशा बसू, इशा देओल आणि सलिना जेटली शामिल होणार आहे. यात विशेष म्हणजे पॉर्न स्टार सनी लिऑन आणि एली अबराम याचेही नाव चर्चेत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 2, 2014, 12:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२००५मध्ये आलेल्या नो एन्ट्री चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ या चित्रपटात १० अभिनेत्री काम करणार आहेत. यात लारा दत्ता, बिपाशा बसू, इशा देओल आणि सलिना जेटली शामिल होणार आहे. यात विशेष म्हणजे पॉर्न स्टार सनी लिऑन आणि एली अबराम याचेही नाव चर्चेत आहे.
दरम्यान, या संदर्भात सनी लिऑनचा पती डॅनियल वेबर याने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनीश बाजमी यांनी खुलासा केला की, सनी लिऑनला घेण्याचा निर्णय झाला होता. तिला सोडून इतर अभिनेत्रींचा निर्णय पुढील महिन्यात होईल. मागील चित्रपटातील अभिनेत्रीसह आणखी नव्या चेहऱ्यांना आम्ही घेणार आहोत. मल्टी स्टार चित्रपटामुळे कलाकारांची तारीख घेणे खूप कठीण झाले आहे.
हा चित्रपट २०१५मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सुरूवातीला या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार होता. माझे चित्रपट जवळपास ७० दिवसांत पूर्ण होतात. पण या चित्रपटाला १५० दिवस लागणार आहे. यात सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांचे डबल रोल असणार आहे. आम्ही अजून वेलकमचे काम पूर्ण केलेले नाही.
हा चित्रपट ७५ टक्के पूर्ण झाला आहे, तरीही आम्हांला आणखी वेळ हवा आहे. यापूर्वी सलमानला वेळ देणे शक्य नव्हते. किकनंतर तो सूरज बडजात्या यांचा चित्रपट सलमान करणार आहे. या चित्रपटातही सलमान डबल रोलमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे सनी लिऑनचा मागील चित्रपट रागिनी एमएमएस २ हीट झाला होता. आजकाल सनी लिऑन हिरे व्यापाऱ्यांच्या पार्टीत न्यूड डान्स केला होतो. त्यामुळे चर्चेत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.