www.24taas.com,मुंबई
मराठी तारका तेजस्वनी पंडित. छोटा आणि मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका करणारी अभिनेत्री तेजस्विनी ही बोहल्यावर चढली. अनेकांना मुंबईची भुरळ पडली असताना तेजस्विनी ही महाराष्ट्रातील टोकाचा जिल्हा गोंदियाची सून झाली आहे.
तेजस्विनीचा विवाह गोंदियात १६ डिसेंबरला पार पडला. उद्योगपती रमेश बोपचे आणि आशा बोपचे यांचे चिरंजीव भूषण यांच्यासोबत तेजस्विनी विवाह बंधनात अडकली आहे. सारस्वत ब्राम्हण कुटुंबातील रणजित पंडित आणि आपला काळ गाजविलेल्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची तेजस्विनी मुलगी.
तेजस्विनीचे जरी गोंदियात लग्न झाले असले तरी स्वागत समारंभ पुण्यात होणार आहे. २०१० मध्ये एशिया पॅसिफिक अवॉर्ड मिळविणाऱ्या तेजस्विनीला `अगं बाई अरेच्च्या` तून ब्रेक मिळाला,टारगेट, गैर, रानभूल, मी सिंधूताई सपकाळ आदी तिचे मराठी चित्रपट गाजविले आहेत.
पुण्यात असताना भूषण आणि तेजस्विनीची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. भूषण हा अभियंता म्हणून कार्यरत आहे. गोंदियातील विवाह समारंभादरम्यान तेजस्विनीने पारंपरिक पुणेरी वेशभूषा केली होती, तर भूषण पारंपरिक पोवार समाजाच्या वेशात होता. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या दोघांचा लग्न सोहळा झाला.