www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ची (एनएफडीसी) राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती सिनेमा ‘द गुड रोड’ ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ‘द गुड रोड’ या चित्रपटात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मुख्य भूमिका साकारलीय.
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘द लंच बॉक्स’ची निवड ऑस्करच्या शर्यतीत धावण्यासाठी होऊ शकते, असं अनेकांचं मत होतं. ‘द लंच बॉक्स’ या सिनेमाचं कान्स फिल्म फेस्टीव्हल २०१३ मध्ये पहिल्यांदा स्क्रिनिंग पार पडलं होतं. यावेळी ‘क्रिटिक विक व्हिवर्स चॉईस अॅवॉर्ड’ या सिनेमानं पटकावला होता. परंतु, आता मात्र ‘द गुड रोड’नं लंच बॉक्सला मागे टाकलंय.
एका आधुनिक गुजराती कथेवर आधारीत ‘द गुड रोड’ हा ज्ञान कोरिया यांचा पहिलाच सिनेमा. ‘रण’च्या सीमावर्ती भागातून ‘बन्नी’पासून वेगळ्या होणाऱ्या हाय-वे वरून प्रवास करत असलेल्या तीन जणांची ही कथा...
हे तिघंही आपापल्या कामासाठी निघालेले आहेत... पण, पुढच्या २४ तासांत ज्या घटना घडतात त्यामुळे त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून जातं.
या सिनेमात सोनाली कुलकर्णीसह अजय गेही, केवल कत्रोदिया, शामजी धाना केरासिया, प्रियांक उपाध्याय आणि पूनम केसरसिंह राजपूत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.