कुंबळे आयसीसीच्या समिती अध्यक्षपदी

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची आज सर्वसंमत्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यापूर्वी या पदावर वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्लाइव्ह लॉईड हे होते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 11, 2012, 03:56 PM IST

www.24taas.com, कोलंबो
भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची आज सर्वसंमत्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यापूर्वी या पदावर वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्लाइव्ह लॉईड हे होते.
आयसीसीचे अध्यक्ष एलेन इसाक यांनी कार्यकारीणीच्या बैठकीनंतर सांगितले की, आता आपल्याला अनिल कुंबलेच्या रुपात नवा अध्यक्ष मिळाला आहे. अनिल कुंबळे यांच्याकडे एक खेळाडू आणि कर्नाटक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून अनुभव आहे.
४१ वर्षीय कुंबळेने आपल्या १८ वर्षांच्या करिअरमध्ये १३२ टेस्टमध्ये ६१२ विकेट आणि २७१ वन डेमध्ये २७१ विकेट मिळविल्या आहेत.