मॅक्क्युलमने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास

वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रॅडन मॅक्क्युलमने त्रिशतक केलं आहे. त्रिशतक करणारा मॅक्क्युलम हा न्यूझीलंडचा पहिला बॅटसमन आहे.

Updated: Feb 18, 2014, 08:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन
वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रॅडन मॅक्क्युलमने त्रिशतक केलं आहे. त्रिशतक करणारा मॅक्क्युलम हा न्यूझीलंडचा पहिला बॅटसमन आहे.
न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात आठ गमावून 680 धावांवर डाव घोषित केला. भारताने 435 धावांचा पाठलाग करतांना २ विकेट गमावल्या होत्या.
मुरली विजय ७ तर शिखर धवन २ धावांवर बाद झाले. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा पुन्हा भारताची धावसंख्या ५० पर्यंत घेऊन गेले.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात मॅक्क्युलमने ३०२ रन्स केल्या आहेत. तर जिमी नीशम १३७ धावांवर नाबाद आहे.
कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी मॅक्क्युलमने २८१ च्या पुढे खेळायला सुरूवात केली, आणि आपलं त्रिशकाचं लक्ष गाठलं. मात्र ३०२ रन्सवर मॅक्क्युलम बाद झाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.