कारकिर्दीतली शेवटची मॅच खेळणाऱ्या मॅकल्लमचा विक्रम

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधली शेवटची मॅच खेळणाऱ्या ब्रॅण्डन मॅकल्लमनं विश्वविक्रम केला आहे. 

Updated: Feb 20, 2016, 08:34 AM IST
कारकिर्दीतली शेवटची मॅच खेळणाऱ्या मॅकल्लमचा विक्रम title=

क्राईस्टचर्च : आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधली शेवटची मॅच खेळणाऱ्या ब्रॅण्डन मॅकल्लमनं विश्वविक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये मॅकल्लमनं 54 बॉलमध्ये सेंच्युरी मारली आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही सगळ्यात जलद सेंच्युरी आहे. 

याआधी विव्हियन रिचर्ड्स आणि मिसबाह उल हक यांच्यानावावर हे रेकॉर्ड होतं. या दोघांनी 56 बॉलमध्ये सेंच्युरी लगावली होती. ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सचा मॅकल्लमनं चांगलाच समाचार घेतला. 79 बॉलमध्ये 145 रन करुन मॅकल्लम आऊट झाला. त्याच्या या इनिंगमध्ये 21 फोर आणि 6 सिक्सचा समावेश आहे. 

39 रनवर असताना गलीमध्ये मिचेल मार्शनं मॅकल्लमचा कॅच पकडला होता, पण अंपायर रिचर्ड केटलबर्ग यांना जेम्स पॅटिनसननं टाकलेला हा बॉल नो बॉल वाटला, त्यासाठी त्यांनी थर्ड अंपायरलाही विचारलं, अखेर पॅटिनसनचा हा बॉल नो असल्याचं स्पष्ट झालं, आणि मॅकल्लमला जीवनदान मिळालं.