युवी म्हणतोय, 'अब कंट्रोल नही होता, यार!'

सिक्सर किंग युवराज सिंग कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन जोरदार कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० पहिली मॅच शनिवारी ८ सप्टेंबर २०१२ ला विशाखापट्टणममध्ये रंगणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 6, 2012, 09:42 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
सिक्सर किंग युवराज सिंग कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन जोरदार कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० पहिली मॅच शनिवारी ८ सप्टेंबर २०१२ ला विशाखापट्टणममध्ये रंगणार आहे. या मॅचमध्ये युवराज तब्बल दहा महिन्यांनंतर मैदानावर उतरणार आहे. `टी-20 वर्ल्डकप`पूर्वी त्याला आपला फिटनेस तपासून पाहाण्याची ही नामी संधी असणार आहे. कॅन्सरमुळे त्याला क्रिकेटच्या मैदानापासून बराच काळ मैदानाबाहेर रहाव लागलं होतं. मात्र, युवी आता प्रतिस्पर्धी टीमला आपला दणका देण्यास आतूर आहे.

युवराज सिंग भारतीय टीमच्या बॅटिंगचा प्रमुख आधारस्तंभ. मात्र, टीम इंडियाच्या धडाकेबाज बॅटसमनला कॅन्सरच्या आजारामुळे क्रिकेटच्या मैदानापासून जवळापास १० महिने दूर रहाव लागलं होतं. वर्ल्डकपनंतर युवीला आपल्या बॅटची जादू दाखवता आली नाही. मात्र, सिक्सर किंग युवराज पुन्हा एकदा सिक्सर्सचा धडाका लावण्यास आतूर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मॅचपासून तो क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करणार आहे. त्याच्या कमबॅकडे भारतीय क्रिकेटप्रेमींचही लक्ष लागलंय. युवी मैदानावर पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी बॉलर्सना आपल्या बॅटचा तडाखा देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. ‘मी मैदानावर उतरण्यासाठी आतूर झालोय, एक एक दिवस मी मोजतोय. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण आहे. आता मी आणखी वाट पाहू शकणार नाही’ असं हळव्या युवराजनं म्हटलंय.
कॅन्सरमुळे युवराजला क्रिकेटच्या मैदानावर आपला जलवा दाखवता आला नव्हता. मात्र, त्याला आता आपल्या बॅटची जादू दाखवण्याची नामी संधी आहे. आता युवी न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये जोरदार कमबॅक करतो का? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.