www.24taas.com, झी मीडिया, हरारे
विराट कोहलीची कॅप्टन्स इनिंग... आणि पदार्पणात अंबाती रायडूने झळकावलेल्या नॉट आऊट हाफ सेंच्युरीच्या जोरावर... टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 6 विकेट्स राखून धडाकेबाज विजयाची नोंद केली... झिम्बाब्वेने दिलेल्या 229 रन्सचं टार्गेट भारताने -- चेंडू राखून पार करत... पाच वन-डे मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे...
भारतीय बॉलर्सनी अचूक टप्प्यावर केलेली बॉलिंग... अमित मिश्राच्या स्पिनची कमाल... विराट कोहलीची कॅप्टन्स इनिंग... आणि पदार्पणातच अंबाती रायडूने झळकावलेली हाफ सेंच्युरी... या सर्व वैशिष्ट्याच्या जोरावर टीम इंडियाने झिम्बाब्वेविरूद्ध वन-डे सीरिजमध्ये विजयी सलामी दिली...
या संपूर्ण मॅचमध्ये लक्षवेधी खेळी ठरली ती टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची 15वी वन-डे सेंच्युरी... विराटच्या याच कॅप्टन्स नॉकमुळे भारताला झिम्बाब्वेचा 6 विकेट्स राखून पराभव करता आला.. झिम्बाब्वेने प्रथम बॅटिंग करताना पाकिस्तानी वंशाच्या सिंकदर रझाच्या 82 रन्सच्या खेळीमुळे भारतासमोर 7 विकेट्स गमावून 229 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं...
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय टीमची सुरूवात अडखळती झाली... शिखर धवन अवघे 17 रन्स तर रोहित शर्मा 20 रन्स काढून पॅव्हिलियनमध्ये परतले...तेव्हा पीचवर आलेल्या कॅप्टन कोहलीने नवख्या अंबातीला सोबतीला घेत भारताची इनिंगच सावरली नाही... तर भारताच्या विजयाचा मार्गही सुकर केला... या दोघांनी तिस-या विकेटसाठी 159 रन्सची पार्टनरशिप केली... दरम्यान कोहलीने वन-डे करिअरमधील 15वी सेंच्युरी पार करताना अशी कामगिरी करणारा यंगेस्ट क्रिकेटर बनण्याचा बहुमानही पटकावला.
सचिनने वयाच्या 25 व्या वर्षी 15 वन-डे सेंच्युरी पूर्ण केल्या होत्या... तर हरारे वन-डेत सेंच्युरी झळकावताना कोहलीचं वय होतं 24 वर्ष 261 दिवस... कोहलीच्या या 115 रन्सच्या कॅप्टन्स इनिंगमध्ये 13 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता..
विराटला गवसलेला हा फॉर्म झिम्बाब्वेयन टीमकरता उर्वरित सीरिजमध्ये निश्चितच डोकेदुखी ठरू शकतो... तर अंबाती रायडूनेही पदार्पणात आपली छाप पाडली आहे...रायडूने 84 बॉल्सचा सामना करताना पदार्पणात हाफ सेंच्युरी झळकावताना 4 फोरच्या मदतीने नॉट आऊट 63 रन्सची खेळी केली...
झिम्बाब्वे दौ-याची विजयाने झालेली सुरूवात भारतीय टीम विराटच्या नेतृत्वाखाली सीरिजच्या उर्वरित मॅचेसमध्येही कायम राखण्यास निश्चितच उत्सुक असतील...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.