www.24taas.com, झी मीडिया, बर्मिंगहॅम
अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान एजबस्टन इथं मेगा फायनल रंगणार आहे. स्पर्धेतील टीम इंडियाची आत्तापर्यंतची जबरदस्त कामगिरी पाहता टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. तर मायदेशात फायनल होत असल्याने इंग्लंडला होम कंडिशनचा फायदा मिळणार आहे. यामुळे आता चॅम्पियन्सचे चॅम्पियन कोण ठरणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय.
क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडला त्यांच्याच भूमित नेस्तनाबूत करुन तिरंगा फटकवण्यासाठी भारतीय युवा सेना आतूर आहे. एजबस्टनला टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रंगणार आहे. तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारणाऱ्या टीम इंडियाचा आत्तापर्यंत प्रवास हा अपराजित राहिली असून आता अखेरचा महाविजय मिळवण्यासाठी टीम सज्ज असेल तर दुसरीकडे क्रिकेटचे जनक असूनही आत्तापर्यंत केवळ एकच टी-२० वर्ल्ड कप वगळता एकही मोठा विजय साकारता न आलेल्या इंग्लंडला मायदेशात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल. घरचं ग्राऊंड, वातावरण आणि प्रेक्षकांची साथ या बाबी इंग्लंडच्या बाजूने जरी असल्या तरीही आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली टीम इंडियाची यंगिस्थानचं वरचढ वाटत आहे.
टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनला रोखण्याचं प्रमुख आव्हान इंग्लिश बॉलर्ससमोर असेल. धवन आणि रोहित शर्मा पुन्हा दमदार ओपनिंग देतील अशीच आशा सा-यांना आहे. तर मीडल ऑर्डरची भिस्त विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिकवर असेल. ऑल राऊंडर रवींद्र जाडेजा हा टीम इंडियाचा ट्रम कार्ड ठरतोय. त्याच्याकडून धोनीला पुन्हा एकदा मॅच विनिंग कामगिरीची अपेक्षा असेल. तर बॉलिंगमध्ये ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या त्रिकुटावर भेदक आणि अचूक मारा करण्याची जबाबदारी असेल. युवा भुवनेश्वर कुमारचा भेदक मार इंग्लंड बॅट्समनचा अडचणीत आणू शकतो. याशिवाय जाडेजाच्या फिरकीबरोबर आर. अश्विनच्या फिरकीपासून इंग्लंडला धोका असेल.
तर अॅशेशपूर्वी इंग्लंडला किक स्टार्ट मिळवून देण्यासाठी कॅप्टन ऍलिस्टर कूक सज्ज असेल. आपली दुसरी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळत असलेल्या इंग्लंडच्या बॅटिंगची धुरा ही जोनाथन ट्रॉटवर प्रामुख्याने असेल. याशिवाय ऍलिस्टर कूक, जो रुट आणि ईयान बेलवरही बॅटिंगची जबाबदारी असेल. फास्ट बॉलर जेम्स एँडरसनकडून टीम इंडियाच्या बॅट्समनला सर्वाधिक धोका असेल. मात्र, जेम्स ट्रेडवेल आणि स्टुअर्ट ब्रॉडसमोर भारतीय बॅट्समनचच आव्हान असेल.
आता अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोण नाव कोरत याकेडच तमाम क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून राहिल आहे. यापूर्वी संयुक्त विजेतेपदावर समाधान मानाव लागलेल्या टीम इंडियाला वैयक्तिक विजेतेपद पटाकवण्याची ही नामी संधी चालून आलीय आणि धोनीची युवा ब्रिगेडही `चॅम्पियन यंगिस्तान` हे बिरुद मिळवण्यासाठी आतूर असेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.