www.24taas.com, मुंबई
एकीकडे मोठा भाऊ इरफान पठाणचे कालच लग्न झाल्यानंतर छोटा भाऊ इरफान पठाणचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. गेल्या 10 वर्षांपासून अनिवासी भारतीय शिवांगीबरोबर असलेले क्रिकेटपटू इरफान पठाणचे अफेअर संपुष्टात आले आहे. इरफानने आता आपण `सिंगल` असल्याचे सांगितल्यामुळे नव्याच चर्चेला उधाण आले आहे.
उल्लेखनीय म्हणजे नुकताच 14 फेब्रुवारी रोजी व्हे`लेंटाईन डे साजरा करण्यात आला. या दिवशी प्रियकर किंवा प्रेयसी आपल्या साथीदारासमोर आपले प्रेम व्यक्त करतो. 14 तारखेपासून बरोबर सातव्या दिवशी ब्रेकअप डे साजरा केला जातो. आणि याच दिवशी ही बातमी समोर आली आहे.
वर्ष 2013 मधील भारतीय क्रिकेट टीममधील सर्वात मोठे ब्रेकअप स्टार गोलंदाज इरफान पठाण आणि शिवांगी यांचे आहे. ज्या वेळी इरफान मैदानात आपल्या कामगिरीने चमकत होता. त्याचवेळी मैदानाबाहेर ऑस्ट्रेलियात राहणारी सीए शिवांगीबरोबरील त्याच्या अफेअरचीही मोठी चर्चा सुरू होती.