www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आता आणखी काही गंभीर बाबी पुढे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राजस्थान रॉयल संघाला आणि या संघाचा कॅप्टन असणाऱ्या राहुल द्रविडला या प्रकरणाचा संशय आधीच आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी पंजाबविरूद्ध मोहाली येथे झालेल्या सामन्यात श्रीशांतला खेळविण्याची राजस्थानचा कर्णधार राहुल द्रविडची इच्छा नव्हती. मात्र, तरीही श्रीशांत या सामन्यात खेळला आणि बुकीच्या सूचनेनुसार त्याने टॉवेल ट्राऊजरमध्ये खोचून बुकींना हिंटही दिली आणि एकाच षटकात १३ धावाही...
१२ मे रोजी चेन्नईविरूद्ध झालेल्या सामन्यानंतर रागीट स्वभावामुळे आपण फार काळ संघात राहू शकणार नाही, याची श्रीशांतला जाणीव झाली होती, अशी माहिती राजस्थान रॉयलच्या एका खेळाडूने दिली. यामुळे त्याने स्वत:हून हॉटेल सोडण्याविषयी संघ व्यवस्थापनाला विचारणा केली होती.
त्यानंतर झालेल्या, १५ मे रोजी मुंबईविरूद्ध झालेल्या सामन्यात मात्र, श्रीशांतला संघाबाहेर बसविण्यात आले. राजस्थान रॉयलच्या व्यवस्थापनाने श्रीशांतबरोबरील सर्व आर्थिक व्यवहारांची पूर्तता अगोदरच केली होती. १६ मे पासून तर श्रीसंत संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी नव्हता. श्रीसंत वारंवार शिस्तदभंग करत होता. त्याहच्यां वर्तणुकीमुळे सर्वांना त्रास होत होता. संघात स्थावन मिळविण्यासाठी तो अनेकदा वाद घालायचा. त्यापने राहुल द्रविडसोबतही प्रचंड वाद घातला होता. अंतिम अकरामध्ये खेळण्या्साठी त्याची धडपड कशासाठी असायची, हे आता कळले. कदाचित बुकींच्या दडपणामुळे तो असे करत असावा, असे काही जणांचं म्हाणणं आहे.
मुंबईत अटक होण्यापूर्वी चंडिला फिक्सिंगमध्ये अडकला असण्याची भीती संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली होती. मात्र, त्या वेळी ठोस पुरावे हातात नसल्यामुळे त्याला वगळण्याचे टाळण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.