आयपीएल आणि महाराष्ट्रातला दुष्काळ!

आयपीएल म्हणजे इंडियन पाप लीग..क्रिकेटच्या या पाप लीगमुळे भारतीय क्रिकेटचं नुकसानंच झालंय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना क्रिकेटला बदनाम करणा-या लीग गरजच काय असा प्रश्नही उपस्थित होतोय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 16, 2013, 06:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल म्हणजे इंडियन पाप लीग..क्रिकेटच्या या पाप लीगमुळे भारतीय क्रिकेटचं नुकसानंच झालंय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना क्रिकेटला बदनाम करणा-या लीग गरजच काय असा प्रश्नही उपस्थित होतोय.वास्तविक कोट्यवधी रुपयांची ब्रँड व्हॅल्यू असणा-या या लीगमुळे क्रिकेटचं नुकसानंच झालंय.
2009मध्ये आयपीएलची ब्रॅण्ड व्हल्यू 109 अरब रुपये होती. 2010मध्ये आयपीएलची व्हल्यू 224 अरब रुपये झाली. 2011मध्ये आयपीएलची ब्रॅड व्हल्यू 199 होती...तर 2012मध्ये आयपीएलची ब्रॅण्ड व्हल्यू 159 अरब रुपये झाली...
आयपीएलच्या प्रत्येक टीमची किंमती कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे...
मुंबई इंडियन्स -608 कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 606 कोटी रुपये
चेन्नई सुपरकिंग्स - 494 कोटी रुपये
डेक्कन चार्जर्स - 581 रुपये
किंग्स इलेव्हन पंजाब - 413 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स - 364 कोटी रुपये
दिल्ली डेअरडेव्हिल्स - 456 कोटी
कोलकाता नाईट रायडर्स - 407 कोटी रुपये
पुणे वॉरियर्स -1800 कोटी रुपये
आयपीएलच्या टीम्सच्या किमती पाहिल्या तर त्या जवळपास सहा हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे. महाराष्ट्र सरकारनं केंद्राला दुष्काळग्रस्तांसाठी 2900 कोटी रुपयांची मागणी केली होती...त्यामुळेच आयपीएलच्या टीमवर खर्च करण्यात येणार हा पैशात अनेक दुष्काळग्रस्त गावात पाणी देता आलं असतं. सहा हजार कोटी रुपयांत महाराष्ट्रातील 11000 दुष्काळग्रस्त गावांना 120 दिवसांचं पाणी देता आलं असतं. तीन हजार कोटींमध्ये 11000 दुष्काळग्रस्त गावांना 60 दिवसांचं पाणी देता आलं असतं.
वास्तविक आयपीएलनं भारतीय क्रिकेटला केवळ बदनामीच दिलीय.त्यामुळे क्रिकेटला बदनाम करणा-या या लीगपेक्षा दुष्काळग्रस्तांची तहान नक्कीच भागवता आली असती...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.