अॅरोन फिंचचा धमाका, १४ सिक्स आणि ११ फोर

टी-२०त ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच टी-२०मध्ये फिंचनं तडाखेबाज १५६ रन्सची इनिंग खेळली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 31, 2013, 12:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, साउथएम्प्टन
टी-२०त ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच टी-२०मध्ये फिंचनं तडाखेबाज १५६ रन्सची इनिंग खेळली.
टी-२०च्या इतिहासात ही सर्वात मोठी इनिंग ठरलीय. अवघ्या ६३बॉल्समध्ये त्यानं १५६रन्सची तुफानी इनिंग केली. त्यानं आपल्या या रेकॉर्ड इनिंगमध्ये १४ सिक्स आणि ११ फोर लगावले. फिंचनं टी-२० इतिहासातील दुसरी फास्टेस्ट सेंच्युरी लगावली...तर कांगारुंकडून टी-२०त सेंच्युरी लगावणारा तो पहिलाच बॅट्समन ठरलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ-अन्य खेळासह