वेलिंग्टन कसोटी ड्रॉ, मालिकेत भारताचा पराभव

वेलिंग्टन कसोटी सामना ड्रा घोषित करण्यात आला आहे. कर्णधार मॅक्क्यूलम आणि कर्णधार धोनीच्या सहमतीने हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. यावरून न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आहे.

Updated: Feb 18, 2014, 12:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन
वेलिंग्टन कसोटी सामना ड्रा घोषित करण्यात आला आहे. कर्णधार मॅक्क्यूलम आणि कर्णधार धोनीच्या सहमतीने हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. यावरून न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आहे.
विराटच्या शतकी खेळीनंतर दोन्ही कर्णधारांनी सहमतीने सामना ड्रॉ घोषित केला आहे.
न्यूझीलंडने ही मालिका १-० ने खिशात घातली आहे. न्यूझीलंडने भारतासमोर ६७ षटकांत विजयासाठी ४३५ धावांचं ठेवलं होतं.
न्यूझीलंडकडून वेलिंग्टन कसोटी सामन्यात भारताला ४३५ रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र सामना ड्रॉ होईपर्यंत भारताने १६६ रन्स केल्या
विराट कोहलीने १२९ चेंडूत शतक झळकावलं, विराटने १०५, रोहित शर्माने ३१ रन्स केल्या. विराट-रोहित जोडीने ११२ धावांची भागीदारी केली.
टीम इंडियाने आपले दोन विकेट १० रन्सवर गमावल्या होत्या, मुरली विजयने ७, शिखर धवनने २ रन्स केल्या.
यानंतर विराट आणि चेतेश्वर पुजाराने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र ५४ धावांचा स्कोर असतांना, पुजारा १७ रन्सवर बाद झाला.
दरम्यान या कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलमने त्रिशतक झळकावलं, तसेच जिमी नीशामने नाबाद शतक केलं. त्यामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ८ बाद ६८० धावांची मजल मारली.
न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलमने हा त्रिशतक झळकवणारा न्यूझीलंडचा पहिलाच बॅटसमन आहे.
वेलिंग्टन कसोटीत विराट कोहलीन शानदार शतक झळकावलं आहे. विराट कोहलीने १२९ चेंडूत हे शतक झळकावलं आहे.
मॅक्क्युलमच्या त्रिशतकी खेळीनंतर घायाळ झालेल्या टीम इंडियासाठी विराटची खेळी दिलासा देणारी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.