www.24taas.com,झी मीडिया, ढाका
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्ताने भारताला चार विकेटने हरवलं आहे. पाकिस्ताने ४९.४ षटकात २४९ रन्स करून हा सामना जिंकलाय. यामुळे या स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलंय.
ती शेवटची ओव्हर
पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये १० रन्स हव्या होत्या, तसेच फक्त दोन विकेट हातात शिल्लक होत्या. या दरम्यान अश्विनने सईद अजमलला पहिल्याच चेंडूत बोल्ड केलं.
पुढच्या चेंडूत जुनैद खानने एक रन काढला आणि शाहीग आफ्रिदीला स्ट्राईक दिली. आफ्रिदीने लगोपाठ दोन षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिलाय.
पाकिस्तानचा डाव
पाकिस्तानकडून मोहंमद हफीजने सर्वात जास्त ७५ धावा केल्या.
पाकिस्तानच्या डावाला शरजील आणि अहमद शहजादने चांगली सुरूवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली.
शरजील २५ रन्सवर अश्विनच्या चेंडूने बोल्ड झाला. अहमद शहजादने ४२ रन्से केल्या. कॅप्टन मिस्बाह-उल-हकने फक्त एक रन काढला आणि आऊट झाला.
यानंतर मोहम्मद हफीज आणि शोएब मकसूदने पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची महत्वाची भागीदारी केली.
मोहंमद हफीजला अश्विनने बाद केलं. हफीजने आऊट झाल्यानंतर शोएब मकसूद ३८ रन्स केले पण तो रन आऊट झाला.
पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये १० रन्स हव्या होत्या, तसेच फक्त दोन विकेट हातात शिल्लक होत्या. या दरम्यान अश्विनने सईद अजमलला पहिल्याच चेंडूत बोल्ड केलं.
पुढच्या चेंडूत जुनैद खानने एक रन काढला आणि शाहीग आफ्रिदीला स्ट्राईक दिली. आफ्रिदीने लगोपाठ दोन षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिलाय
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.