इंग्लंड तीन बाद १६१ रन्स

नागपूर येथील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने जुगार घेळत ३२६ रन्सवर डाव घोषित करून इंग्लंडला खेळण्यास आमंत्रित केले. इंग्लंडच्या दोन विकेट झटपट बाद झाल्यात. तिसरी विकेट १४३ रन्सवर गेली. इंग्लंडने दिवसभरात १६१ रन्स केल्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 16, 2012, 04:42 PM IST

www.24taas.com,नागपूर
नागपूर येथील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने जुगार घेळत ३२६ रन्सवर डाव घोषित करून इंग्लंडला खेळण्यास आमंत्रित केले. इंग्लंडच्या दोन विकेट झटपट बाद झाल्यात. तिसरी विकेट १४३ रन्सवर गेली. इंग्लंडने दिवसभरात १६१ रन्स केल्या.
ट्रोट ६६ तर इयान बेल २४ रन्सवर खेळत आहेत. तर इंग्लडचा कुक केवळ १३ रन्सवर आऊट झाला. कॉम्पटन ३४ रन्स करून आऊट झाला. ट्रोट २२ रन्सवर खेळत आहे. कुकला आर अश्विनने आऊट केले तर कॉम्पटनची विकेट ओझाने काढली. तिसरी विकेट के पी पिटरसन यांची गेली. त्याने सहाच रन्स केल्यात.
नागपूर टेस्टच्या चौथ्या दिवशी कॅप्टन धोनीने धाडसी निर्णय घेत भारताची पहिली इनिंग ९ आऊट ३२६ रन्सवर घोषित केला. इंग्लंडला माफक ४ रन्सची आघाडी दिली... सीरिजमध्ये २-१ने पिछाडीवर असलेली टीम इंडिया नागपूर टेस्ट जिंकून सीरिज ड्रॉ करण्याच्या तयारीत आहे... त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये भारतीय बॉलर्ससमोर आव्हान असणार आहे ते इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळण्याचं.
तत्पूर्वी ८ आऊट २९७ पासून पुढे खेळण्यास सुरूवात करणा-या अश्विन-ओझा जोडीने भारताला ३१७ पर्यंत मजल मारून दिली आणि ओझा पानेसरच्या बॉलिंगवर आऊट झाला. भारताची इनिंग घोषित झाली तेव्हा अश्विन २९ रन्सवर तर ईशांत शर्मा २ रन्सवर नॉट आऊट होता.
धाव फलक-
इंग्लंड - दुसरा डाव 161/3 (79.0 ov)
इंडिया - 326/9 घोषित
इंग्लंड - पहिला डाव 330