वन-डे सीरिजवर आपलं नाव कोरायला टीम इंडिया सज्ज!

टेस्ट सीरिजमध्ये २-०नं विंडीजला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय टीम आतूर असेल. धोनी अँड कपंनीनं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये विंडीजपेक्षा सरस ठरली आहे. आता वन-डे सीरिजमध्येही ड्वेन ब्राव्होच्या वेस्ट इंडिज टीमला व्हाईट वॉश देण्यास टीम इंडिया आतूर असणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 21, 2013, 09:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोच्ची
टेस्ट सीरिजमध्ये २-०नं विंडीजला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय टीम आतूर असेल. धोनी अँड कपंनीनं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये विंडीजपेक्षा सरस ठरली आहे. आता वन-डे सीरिजमध्येही ड्वेन ब्राव्होच्या वेस्ट इंडिज टीमला व्हाईट वॉश देण्यास टीम इंडिया आतूर असणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली वन-डे कोचीच्या नेहरु स्टेडियममध्ये रंगणार आहे. टेस्ट सीरिजमध्ये २-०नं विंडीजचा धुव्वा उडवल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये भारतीय टीम विंडीजला पराभवाचा धक्का देण्यास आतूर असेल. सचिनच्या अखेरच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीमनं सांघिक खेळ करत बाजी मारली होती. आता वन-डे सीरिजमध्ये विंडीजचा धुव्वा उडवण्यास धोनी अँड कंपनी सज्ज झाली आहे.
रोहित शर्मा अणि शिखर धवन या ओपनवर भारतीय टीमला दमदार ओपनिंग करुन देण्याचं आव्हान असेल. रोहित शर्मा सध्या ड्रीम फॉर्मममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डबल सेंच्युरी झळकावल्यानंतर त्यानं कोलकाता आणि मुंबई अशा दोन्ही टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली होती. आता त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडून टीमला असणार आहे. तर विराट कोहली हे धोनीचं कुठल्याही मॅचमध्ये हमखास चालणारं ट्रम्प कार्ड आहेच. याशिवाय युवराज सिंग, सुरेश रैना आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मिडल ऑर्डरची धुरा सांभाळतली.
तर रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विनवर स्पिन डिपार्टमेंटची जबाबदारी असेल. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीला वेस्ट इंडिजच्या बॅट्समनना रोखण्याचं आव्हान असेल. तर दुसरीकडे ख्रिस गेल भारतीय टीमसाठी धोकादायक ठरु शकते. टेस्टमध्ये गेलची बॅट शांत होती. मात्र, गेल नावाचं वादळ एकदा का घोंगावलं तर भारतीय टीमला त्याच्या तडाख्यातून वाचणं अशक्य होणार आहे. सुनील नरेन आणि नरसिंग देवनारायणपासून भारतीय बॅट्समनना सावध रहावं लागणार आहे. कागदावर भारतीय टीम विंडिजपेक्षा सरस आहे.
टेस्टमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानं भारतीय टीमचा आत्मविश्वास निश्चितच दुणावलेला असणार आहे. त्यामुळं एखादा चमत्कारच विंडीजला भारतीय टीमपासून वाचवू शकेल. आता भारतीय टीम आपला टेस्टमधील फॉर्म कायम राखते की, विंडीजची टीम धोनी अँड कंपनीला पराभवाचा धक्का देते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x