www.24taas.com, झी मीडिया, बुलावयो
पाचव्या आणि अखेरच्या वन-डेमध्ये टीम इंडियानं झिम्बाब्वेवर मात करत पाच वन-डे मॅचेसची सीरिज 5-0 ने जिंकली. या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिल्या विजयाची नोंद केली.
बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर भारतानं झिम्बाब्वेवर मात केली. मॅचमध्ये सहा विकेट्स घेणारा अमित मिश्रा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. झिम्बाब्वेवर दणदणीत मात करत टीम इंडियानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज जिंकली. या विजयासह यंगिस्तानने सीरिज विजयाची हॅटट्रिकही नोंदवली आहे.
सर्वप्रथम इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवल्यानंतर भारतीय टीमने कॅरेबियन बेटांवर रंगलेल्या ट्राय सीरिजमध्ये विजयाची नोंद केली. त्यानंतर आता झिम्बाब्वेतही सीरिज विजय साजरा करत 2010मध्ये झिम्बाब्वेत झालेल्या पराभवाचीही टीम इंडियाने सव्याज परतफेड केली आहे...
झिम्बाब्वे दौ-यामध्ये अमित मिश्राच्या स्पिन बॉलिंगनं चांगलीच कमाल केली. आपल्या स्पिन बॉलिंगने त्याने झिम्बाब्वेच्या बॅट्समनची चांगलीच दाणादाण उडवली. शेवटच्या वन-डेमध्ये त्यानं झिम्बाब्वेच्या 6 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
आर. अश्विनच्या अनुपस्थितीत त्यानं भारताच्या स्पिन बॉलिंगची धुरा समर्थपणे सांभाळली. झिम्बाब्वे दौ-यात भारतानं जे निर्भेळ यश मिळवलं त्यामध्ये अमित मिश्राचा वाटा मोलाचा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.