www.24taas.com,नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० ची प्रॅक्टिस मॅच आज दुपारी २ वाजता क्रिकेटप्रेमींसाठी एक स्पेशल ट्रीट ठरणार आहे. भारत-पाक लढतीमध्ये दोन्ही देशांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. त्यामुळेच या मॅचेसना युद्धाचं स्वरुप प्राप्त होतं. टी-२० वर्ल्ड कपपूर्वी या दोन्ही टीम्समध्ये मॅच होत असल्यानं चाहत्यांसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचची रंगत टी-२० वर्ल्ड कपपूर्वीच क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. प्रॅक्टिस मॅचमध्ये या दोन्ही टीम्स आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे टी-२० वर्ल्ड कपपूर्वी या दोन्ही टीम्समधील मॅचची अनोखी मेजवानी जगभरातील क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.
दरम्यान, दोन्ही टीम्स या केवळ विजयाच्या उद्देशानचं मैदानावर उतरतात. त्यामुळे यावेळीही या मॅचकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष असणार आहे. दोन्ही टीम्स फॉर्मात असल्यानं एक काँटे की टक्कर क्रिकेटप्रेमींना या निमित्तानं पाहयला मिळणार आहे. भारतानं प्रॅक्टिस मॅचमध्ये लंकेला पराभूत करत धडाक्यात सुरुवात केली आहे. तर पाकिस्तानच्या टीमनं टी-२०वर्ल्ड कपपूर्वी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धुळ चारत आपेल इरादे स्पष्ट केले आहेत.
कांगारुंना परास्त केल्यानं पाक टीमचा आत्मविश्वाच चांगलाच उंचावलाय त्यामुळे भारतीय टीमला त्यांच्यापासून सावध रहाव लागणार आहे. क्रिकेटविश्वातील ही अनप्रेडीक्टेबल टीम भारतासाठी चांगलीच धोकादायक ठरु शकते. त्यामुळे पाकला रोखण्यासाठी धोनी अँड कंपनीला ठोस रणनितीनं मैदानात उतराव लागणार आहे. प्रॅक्टिस मॅच असली तरी, या मॅचमध्ये भारतीय टीम आपंल सर्वस्व पणाला लावेल यात शकंच नाही.
विराट कोहली या इनफॉर्म बॅट्समनच्या कामगिरीवर बरच काही अवलंबून असणार आहे. लंकेविरुद्ध टॉप ऑर्डरनं निराशा केल्यानं, या मॅचमध्ये त्यांना याची कसर भरून काढावी लागणार आहे. भारतीय बॅट्समन विरुद्ध पाकिस्तानचे आग ओकणारे बॉलर्स असाच मुकाबला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतानं २००७ मध्ये तर पाकनं २००९मध्ये टी-२० वर्ल्ड कप कब्जा केला आहे. त्यामुळे या वर्ल्ड चॅम्पियन्स टीम्स मैदानावर सर्वोत्तम कामगिरी कऱण्यासाठी आतूर असणार आहे. आता, या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये कोणती टीम बाजी मारते ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.