www.24taas.com, झी मीडिया, अबुधाबी
राजस्थान रॉयल्स टीमनं शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये चांगला विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये मॅच टाय झाल्यानंत राजस्थान रॉयल्सला सर्वाधिक चौकार मारल्यानं विजयी घोषित करण्यात आलं.
आयपीएल-७ मधली ही पहिली सुपर ओव्हर मॅच होती. राजस्थान रॉयल्सनं पहिल्यांदा बॅटिंग करुन पाच विकेट गमावत १५२ रन्स केले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या केकेआरनं आठ विकेट गमावून १५२ रन्स केले आणि मॅच टाय केली. सुपर ओव्हरमध्ये नाईट रायडर्सनं ११ रन्स केले. राजस्थान रॉयल्सनं सुद्धा आपल्या कोट्यातील सहा बॉल्स वर ११ रन्स बनवले. आता मॅचचा निकाल सर्वाधिक चौकार कोणी मारले यावर अवलंबून होता. मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं १७ तर नाईट रायडर्सनं १२ चौकार मारले आणि राजस्थाननं मॅच जिंकली.
मॅचमध्ये ११ रन्स देवून तीन विकेट घेणाऱ्या राजस्थानच्या जेम्स फाल्कनरनं मॅन ऑफ द मॅचचा खिताब मिळवला. राजस्थाननं आतारपर्यंत खेळलेल्या पाच मॅचमध्ये तीन मॅच जिंकल्या आहेत तर कोलकातानं तीन मॅच गमावल्या आहेत.
सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?
सुपर ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि शाकिब अल हसन नाईट रायडर्सकडून बॅटिंगला आहे. यादवला जेम्स फाल्कनरनं पहिल्याच बॉलमध्ये रन आऊट केलं. दुसऱ्या बॉलवर मनीष पांडेयनं एक रन काढला. तिसऱ्या बॉलमध्ये शाकिबनंही १ रन काढला. चौथ्या बॉलमध्ये मनीषनं शानदार षटकार लगावला. पाचव्या बॉलवर पुन्हा मनीषनं १ रन काढला आणि अखेरच्या बॉलवर शाकिब रन आऊट झाला. अशाप्रकारे सुपर ओव्हरमध्ये कोलकातानं ११ रन्स केले आणि दोन विकेट गमावल्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.